IMPIMP

Crime News | पोलीस कोठडीतील 25 वर्षीय आरोपीने घेतला गळफास, पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

by nagesh
Builder Paras Porwal Suicide | mumbai famous builder paras porwal ended his life by jumping from the building

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन  Crime News | अमरावती शहरातील राजपेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. या कोठडीत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अटक केलेल्या २५ वर्षीय तरूणाला ठेवण्यात आले होते. त्याने तेथेच शर्टाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे (Crime News) उघडकीस आले आहे. सागर ठाकरे असे त्याचे नाव असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांच्या मारहाणीतच सागरचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

१७ ऑगस्टला अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून आणि बलात्काराचा गुन्हा सागर राठोड विराेधात दाखल करण्यात आला हाेता. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी सागर ठाकरे आणि अल्पवयीन मुलगी दोघेही फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाले होते. त्यावेळेस पोलिसांनी सागरला अटक केली व मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले. यावेळी आरोपी सागर ठाकरेला १८ ऑगस्ट रोजी अमरावती न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने २० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली. १९ ऑगस्टला सागरने आपल्या शर्टाने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सागर मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ज्यावेळी
न्यायालयातून सागरला पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यावेळी त्याची मानसिकस्थिती चांगली होती. मात्र, कोठडीत त्याला मारहाण करण्यात आली. त्यामुळे आक्रमक भूमिका घेत सागरचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी ही केली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असल्याने त्यांनी मृतदेह स्वीकारला आहे. तसेच नातेवाईकांनी सागरच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये मदत द्यावी व त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावा, अशी मागणी केली आहे.

 

Web Title: Crime News | man accused of raping minor dies by suicide at amaravati

 

हे देखील वाचा :

Pension System | नोकरी करणार्‍यांसाठी खुशखबर ! वाढू शकते निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम, जाणून घ्या

EPFO | जर तुम्ही सुद्धा बदलला असेल जॉब तर ‘या’ पध्दतीनं ट्रान्सफर करा PF चे पैसे, घर बसल्या होईल काम

Pune Crime | पुण्यातील पतसंस्थेच्या अध्यक्षाची आत्महत्या; उपाध्यक्षासह 7 सभासदांवर गुन्हा

 

Related Posts