IMPIMP

Pune Crime | पुण्यातील पतसंस्थेच्या अध्यक्षाची आत्महत्या; उपाध्यक्षासह 7 सभासदांवर गुन्हा

by nagesh
Pune Crime | Mangesh Kanchan arrested by Loni Kalbhor police for threatening two doctors and demanding Rs 30 lakh ransom

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | सभासदांचे पैसे देण्यास दबाव टाकून घेतलेले पैसे व्याजासह परत करण्यासाठी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष आणि सभासदांनी अध्यक्षांना त्रास दिला. या त्रासाला वैतागून पतसंस्थेचे अध्यक्ष हरीशचंद्र खंडु भरम Harishchandra Khandu Bharam (वय-61 रा. निगडी गावठाण) यांनी आत्महत्या (Suicide) केली. भरम यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी 7 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

बाळासाहेब काठथवटे, विजय तिकोणे, जुबेर शेख, शकिल मन्यार, आश्मा शेख, मेजर सय्यद, चंद्रकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हरीशचंद भरम यांची मुलगी कांचन अमित नाईक (वय-34 रा. अथर्वपुर्व सोसायटी, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिशचंद्र भरम हे कसबा नागरी पतसंस्थेचे (Kasaba Nagari Patsanstha) अध्यक्ष होते.
अध्यक्ष असताना आरोपी उपाध्यक्ष व सभासद यांनी संगनमत करुन भरम यांना सभासदांनी गुंतवलेले पैसे देण्याचा तगादा लावला.
तसेच विजय तिकोणे याने घेतलेले 5 लाख रुपये भरम यांच्या नावावर घेतल्याचे सांगून आरोपींनी पैसे व्याजासह परत करण्यास सांगितले.
पैसे देण्यासाठी मयत भरम यांना वेळोवेळी फोन करु धमकी (Threat) देऊन मानसिक त्रास दिला. आरोपींच्या त्रासाला वैतागून हरीशचंद्र भरम यांनी आत्महत्या केली.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Suicide of Pune’s Kasba Nagri credit union president; Crime on 7 members including the vice president

 

हे देखील वाचा :

SBI च्या 46 कोटी ग्राहकांनी लक्ष द्यावे ! विना अडथळा पहिजे असेल बँकिंग सर्व्हिस तर तात्काळ पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा अडकतील पैसे

DSK Scam | डीएसके प्रकरणात 1000 पानांचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट सादर

Pune Crime | विनापरवानगी बाजीराव पेशवेंची मिरवणूक ! ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षांसह 25 जणांविरूध्द गुन्हा

Burglary in Pune | फिरायला गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, 90 लाखांचा ऐवज लंपास

Pune News | टास्क फोर्स तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच शाळांबाबतचा निर्णय घेतला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

Related Posts