IMPIMP

बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडेंचा नवा ‘मास्टरस्ट्रोक’ !

by pranjalishirish
Dhananjay Munde | ncp leader dhananjay munde on devendra fadnavis and deputy cm post in vidhansabha

सरकारसत्ता ऑनलाइन राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2021) यंदा बीड Beed जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याचे विषय असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग आणि बीड जिल्ह्यातील आध्यात्मिक श्रद्धास्थाने यांना निधी देण्यात आला आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा हा राजकीय मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.

अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना बीड Beed जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील प्रभू वैजनाथाचे मंदिर, पुरुषोत्तम पुरी येथील पुरुषोत्तम मंदिर, श्रीक्षेत्र भगवानगड, श्रीक्षेत्र नारायणगड आणि श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद केल्यानं बीडकरांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. नगर-बीड-रेल्वे मार्गाचं काम प्रगतिपथावर असल्याचं सांगत आहे . लवकरच हा मार्ग पूर्ण होणार असल्याचं अर्थसंकल्पातून समोर आलं आहे. सोबतच परळीमधील प्रभू वैद्यनाथाच्या विकासासाठी आर्थिक निधीची तरतूद केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता तरतूद केलेल्या देवस्थानांचा अधिक विकास होणार आहे.

या क्षेत्राकडे बीड Beed जिल्ह्याच्या राजकारणात सत्ता परिवर्तनाची केंद्रे म्हणून पाहिलं जातं. मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांचा वर्ग जोडला गेला असल्यानं या आध्यात्मिक गडांच्या विकासाचा दुवा पकडत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आध्यात्मिक क्षेत्राला भरीव निधी मिळवून दिला आहे. तो धनंजय मुंडे यांच्या भविष्यकाळातील राजकारणाला पूरक ठरणार आहे.

बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या संदर्भातही गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळाला आर्थिक निधी देण्यासंदर्भात घोषणा केल्यानं मजुरांमधूनदेखील आनंद व्यक्त केला जात आहे. यातच स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळासाठी प्रत्येक साखर कारखान्यास एकूण गाळपावर प्रतिटन 10 रु.

सेस लागणार, यातून जेवढी रक्कम जमा होईल तेवढीच रक्कम राज्य शासन देणार आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी यावर्षीचा अर्थसंकल्प भरभरून देणारा ठरला आहे.

Also Read :

शिवसेना-राष्ट्रवादी’च्या भूमिकेवर नाना पटोले भडकले !

औरंगाबाद नामांतराबाबत मुख्यमंत्र्यांनी हात झटकले; म्हणाले…

‘सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पतीच जबाबदार’ : सुप्रीम कोर्ट

खळबळजनक ! मनसुख हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी केल्याचा संशय; फडणवीसांचा आरोप

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मिळाला ‘हा’ मोठा सन्मान, ‘आशिया पोस्ट फेम इंडिया’ कडून दखल

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Related Posts