IMPIMP

Bhandara fire case : भंडारा दुर्घटनेप्रकरणी 40 दिवसानंतर 2 नर्सवर FIR दाखल

by sikandershaikh
bhandara case

भंडारा : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) bhandara fire case | येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्घटनेप्रकरणी तब्बल ४० दिवसानंतर दोन नर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा भंडारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री साकोलीचे उपविभागीय अधिकारी अरुण वायकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. शुभांगी साठवणे आणि स्मिता आंबिलढुके असे गुन्हा दाखल झालेल्या नर्सची नावे आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दिली.

९ जानेवारीला पहाटे भंडारा सामान्या रुग्णालयात लागलेल्या आगीत (bhandara fire case) दहा बालकांचा जळून मृत्यू झाला होता. आतापर्यत याप्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद होती. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशीही करण्यात आली. त्यामध्ये दोषी आढळलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकासह सात जणांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यानंतर आता या प्रकरणी दोन नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकपूर्व जामिनासाठी या दोन्ही नर्सने भंडारा जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर २२ फेब्रुवारी सुनावनी होणार आहे.

धक्कादायक ! पत्नीचा निर्घृण खून करून पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : राम मंदिरासाठी अवैधरित्या ‘वर्गणी’ची वसूली, FIR  दाखल  

कोल्हापूर : वडगावचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांचे निधन

एकेकाळी केलं राम मंदिराच्या आंदोलनाचं नेतृत्व; विश्व हिंदू परिषदेच्या ज्येष्ठ नेत्याच्या भावाकडून 11 कोटींची देणगी !

वनमंत्री राठोड यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांचे मिश्किल उत्तर; म्हणाले- ‘भेट झाली तर सांगेन पत्रकार तुमची वाट बघतायत’

श्रीगोंद्यातील ज्येष्ठ नेते सदाशिव उर्फ सदाअण्णा पाचपुते यांचे निधन

Related Posts