IMPIMP

Bhandara Crime | आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाने शेजाऱ्याचा चिरला गळा; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

भंडारा : सरकारसत्ता ऑनलाइन  Bhandara Crime | एका 49 वर्षीय व्यक्तीची गळा चिरून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara Crime) मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृत व्यक्तीने आरोपी तरुणाच्या आईला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाने ही हत्या (Murder) केल्याची प्राथमिक माहिती समजते. आरोपीने हत्या केल्यानंतर स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, गंगाधर उर्फ बंग्या नत्थु निमजे (Gangadhar alias Bangya Natthu Nimje) असं हत्या झालेल्या 49 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.
तर आकाश विजय श्रीपाद (Akash Vijay Shripad) असं आत्मसमर्पण करणाऱ्या आरोपी तरुणाचं नाव आहे.
आरोपी आणि मृत हे मोहाडी येथील गांधी वार्डात एकमेकांच्या शेजारी राहतात.
आरोपी आणि मृत व्यक्तीचं नेहमी एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. दोन्ही कुटुंबाचे संबंधही चांगले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

दरम्यान घटनेच्या दिवशी मृत गंगाधर निमजे याने मद्यपान करत आरोपी आकाशच्या घरी आला.
यावेळी दारुच्या नशेत निमजे यांनी कोणतंही कारण नसताना आकाशच्या आईला शिवीगाळ केली.
त्याला जाब विचारला असताना, त्याने घरासमोर उभ्या असलेल्या ओमनी कारची तोडफोड केली.
गंगाधरच्या या कृत्याने संतापलेल्या आकाशने सायकलचा काटेरी कुंपण गेयर निमजे यांच्या गळ्यावर मारला.
जोरात मार लागल्याने ते खाली (Bhandara Crime) कोसळले.

दरम्यान, या घटनेनंतर आरोपी आकाश विजय श्रीपाद हा मोहाडी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. आणि घटनेबाबत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर, पोलिसांनी आरोपी आकाशला अटक (Arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस (Mohadi Police Thane) करीत आहेत.

 

Web Title: Bhandara Crime | neighbor abused mother and vandalism car young man slit neighbors throat murder in bhandara crime

 

हे देखील वाचा :

Pune News | महापौर मुरलीधर मोहोळ यांचा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना इशारा, म्हणाले – ‘प्रशांत जगताप वागणं बदला, अन्यथा शिक्षा भोगावी लागेल’

EPF Loan | पीएफ खात्यावर विना गॅरंटी सहजपणे मिळते कर्ज, जाणून घ्या किती होईल व्याज?

SEBI New Rules | म्युच्युअल फंडच्या खरेदी-विक्रीवर सेबीचा ‘वॉच’, गैरफायदा घेता येऊ नये यासाठी बनवला नवीन नियम

 

Related Posts