IMPIMP

Anti Corruption | महिलेकडे 30,000 हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

मालेगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption | अटक करण्यात आलेल्या तक्ररारदार महिलेच्या पतीविरोधात कस्टडी रिमांड (Custody remand) वाढवून न घेण्यासाठी आणि दुसऱ्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचे (Demand bribe) निष्पन्न झाल्या आहे. लाचेची मागणी करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक (API) आणि पोलीस नाईक (Police Naik) यांच्या विरोधात मालेगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

पोलीस नाईक सुनिल उर्फ आप्पा हिंमतराव पाडवी (Sunil alias Appa Himmatrao Padvi),
सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप नवनाथ आव्हाड (API Pradip Navnath Awhad) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पाडवी आणि आव्हाड हे मालेगाव येथील आझादनगर पोलीस ठाण्यात (Azadnagar Police Station) कार्यरत आहेत.

याप्रकरणी एका महिलेने मालेगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
तक्रारदार महिलेच्या पतीला आझादनगर पोलिसांनी एका गुन्ह्यामध्ये अटक केली आहे.
दाखल असलेल्या गुन्ह्यात पतीची पोलीस कस्टडी रिमांड वाढून न घेण्यासाठी आणि दुसऱ्या
गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी पोलीस नाईक आणि
सहायक पोलीस निरीक्षक यांनी 30 हजार रुपयांची लाच मागितली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

महिलेने तक्रार केल्यानंतर 8 ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली.
त्यावेळी पोलीस नाईक पाडवी आणि सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी तडजोडीमध्ये
30 हजार रुपये स्विकारण्याचे कबुल केले होते.
मात्र, आपल्यावर सापळा कारवाई होणार असल्याची कुणकुण लागताच त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात (Azadnagar Police Station) गुन्हा दाखल करुन बुधवारी (दि.1) अटक करण्यात आली आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Web Title : Anti Corruption | Anti-corruption nashik registerd crime against api pradeep navnath awhad and policeman sunil alias appa himmatrao for demanding Rs 30,000 bribe from woman

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | ‘भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात आल्यापासून पुणे मनपातील भ्रष्टाचाराने कळस गाठला’ – राष्ट्रवादी

125 Rupee Coin | जारी करण्यात आलं 125 रुपयांचे ‘हे’ विशेष नाणे, जाणून घ्या ते कसे आणि कुठून खरेदी करायचे?

Pornographic Content | शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने फसवणुकीच्या केसमध्ये दिल्ली पोलिसांकडे मागितला ATR

 

Related Posts