IMPIMP

Anti Corruption | बारामतीमध्ये कर्मचार्‍याकडून लाच मागणार्‍या उपविभागीय अभियंत्यावर गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)– Anti Corruption | एखाद्या नागरिकाचे काम करुन देण्यासाठी लाच घेतली जाते. पण आपल्याच कार्यालयातील कर्मचार्‍याचे काम करण्यासाठी लाच मागण्याचा प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बारामती (Baramati) येथे कारवाई करुन एका जलसंपदा विभागातील एका उपविभागीय अभियंत्यासह खासगी व्यक्तीवर गुन्हा (Anti Corruption) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

उपविभागीय अभियंता संजय नारायण मेटे (भीमा उपसा सिंचन प्रकल्प, पलसदेव, ता. इंदापूर) आणि पोपट दशरथ शिंदे (रा. बारामती) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार हे भीमा उपसा सिचंन प्रकल्पाच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांचे मेडिकल बील मंजुरीसाठी उपविभागीय अभियंता संजय मेटे (Sanjay Mete) यांच्याकडे आले होते. बील मंजूर करण्यासाठी त्यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याला खासगी व्यक्ती पोपट शिंदे याने प्रोत्साहन दिले.

 

 

तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक
विभागाने (Anti Corruption) पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने
रविवारी सापळा लावण्यात आला होता. मात्र, आरोपींना संशय आल्याने ते लाच स्वीकारण्यासाठी
आलेच नाहीत. मात्र, लाचेची मागणी करण्यात आली असल्याने दोघांविरुद्ध बारामती तालुका
पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

 

Web Title : anti corruption bribe case registered on sanjay mete in baramati

 

हे देखील वाचा :

Maruti Alto वर मिळत आहे 25 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट! जाणून घ्या पूर्ण डिटेल

LIC Jeevan Akshay | LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून आयुष्यभर मिळतात पैसे, जाणून घ्या अटी

Pooja Chavan Suicide case | मद्यप्राशन करून पूजा चव्हाणने केली आत्महत्या, ‘या’ अहवालातून बाब समोर?

Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास

 

Related Posts