IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | मटक्याच्या केसमध्ये कारवाई न करण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना API निंबाळकर आणि महमद अली अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau (ACB) Mumbai| मटक्याच्या गुन्ह्यामध्ये (Mataka Case) कारवाई न करण्यासाठी
२० हजार रुपयांची लाच मागून मध्यस्थामार्फत १८ हजार रुपयांची लाख घेताना सहायक पोलीस निरीक्षकासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने
(Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) सापळा रचून पकडले. सहायक पोलीस निरीक्षक संजीव होनाजी निंबाळकर API Sanjeev Honaji Nimbalkar (वय ५०) आणि महमद अली वली मनसुरी Muhammad Ali Wali Mansuri (वय ४१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संजीव निंबाळकर हा डोंगरी पोलीस ठाण्यात (Dongri Police Station) नेमणुकीला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

डोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबाळकर व त्याच्या सहकार्‍यांनी एक मटक्याच्या अड्ड्यावर छापा घातला होता. फिर्यादीच्या भावाकडे मटक्याची चिठ्ठी सापडल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले होते. सहायक निरीक्षक निंबाळकर याने मध्यस्थामार्फत फिर्यादी यांना संपर्क साधला. त्यांच्यावर कारवाई न करण्याकरीता २० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) तक्रार आल्यावर त्यांनी पडताळणी केली. पडताळणीमध्ये निंबाळकर याने मध्यस्थामार्फत लाच मागितल्याने निष्पन्न झाले. त्यावरुन डोंगरी पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. फिर्यादीकडून तडजोडीअंती १८ हजार रुपयांची रक्कम मध्यस्थामार्फत स्वीकारताना पकडण्यात आले.

Web Title : Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | API Sanjeev Honaji Nimbalkar and Mohammad Ali Wali Mansuri arrested while taking bribe Dongri Police Station Mataka Case

हे देखील वाचा :

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात रोड रोमियोचा भररस्त्यात धुडगुस ! महिलांच्या मांडीवर जाऊन बसणार्‍या दोघांना अटक

Pune Crime | ‘सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअर’मध्ये नोकरीला असल्याचे सांगून तरुणीला 24 लाखांना गंडा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Pune Corporation | रस्त्याच्या डांबरीकरणासाठीच्या वर्गीकरणावरून भाजपच्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये ‘ठिणगी’

Related Posts