IMPIMP

Burglary in Pune | बाणेर परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी, सव्वापाच लाखाचा ऐवज लंपास

by bali123
Burglary in Pune | burglary in Baner area, looted Rs 5.25 lakh

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Burglary in Pune |पुण्यातील बाणेर परिसरात बंद असलेल्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारुन तब्बल सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बाणेर (Baner) परिसरतील विरभद्रनगरमध्ये घडली असून हा प्रकार शुक्रवारी (दि.20) दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ (Burglary in Pune) होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

विनय विठ्ठल ताम्हाने Vinay Vitthal Tamhane (वय-28 रा. फ्लॅट नं. 202, भक्ती अ‍ॅम्बीयन्स, लेन नं. 8, विरभद्रनगर, बाणेर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार शुक्रवारी सकाळी साडे अकरा ते साडेतीन या दरम्यान घडला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय ताम्हने हे घराला कुलूप लावून ताथवडे येथील एका लग्न समारंभासाठी शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गेले होते.
या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील बेडरुमधील लाकडी कपाटातील सोने-चांदीचे दागिने (Gold-silver jewelry) रोख रक्कम चोरुन नेली.

दुपारी साडेतीनच्या सुमारास विनय हे घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला.
त्यांनी घरात जाऊन पाहिले असता बेडरुमधील समाना अस्ताव्यस्त पडले होते.
घरात चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
चोरट्यांनी घरातील 4 लाख 89 हजार रुपये किमतीचे 148 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 12 हजार रुपयांचे चांदीचे दागिने, 17 हजार रुपये रोख असा एकूण 5 लाख 18 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.
पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस (chaturshringi police station) करीत आहेत.

Web Title : Burglary in Pune | burglary in Baner area, looted Rs 5.25 lakh

Contactless Service | SBI ने 44 कोटी ग्राहकांना ‘या’ 2 आवश्यक नंबरची दिली माहिती, जाणून घ्या

World Entrepreneurs’ Day | तुम्ही सुद्धा सुरू करू शकता आपला व्यवसाय, मोदी सरकार देईल 10 लाखाची मदत; जाणून घ्या

7th pay Commission | मोदी सरकारने ‘या’ कर्मचार्‍यांना दिली 25 टक्के DA ची भेट, पण ‘या’ पध्दतीनं होईल पेमेंट, जाणून घ्या 

Related Posts