IMPIMP

World Entrepreneurs’ Day | तुम्ही सुद्धा सुरू करू शकता आपला व्यवसाय, मोदी सरकार देईल 10 लाखाची मदत; जाणून घ्या

by bali123
PMMY Scheme | loan final claim under two percent interrest subvention shceeme iss shishu loans date extended till 15 december

नवी दिल्ली : वृत्तसंस्था World Entrepreneurs’ Day | आज शनिवार 21 ऑगस्टला जगभरात ‘वर्ल्ड एंटरप्रेन्युअर डे’ (World Entrepreneurs’ Day 2021) साजरा केला जात आहे. यानिमित्त आपण मोदी सरकार (Modi government) च्या एका विशेष योजनेबाबत जाणून घेणार आहोत. तुम्हाला स्वताचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा वाढवायचा असेल, परंतु भांडवल नसेल तर यासाठी स्वस्त कर्ज मिळू शकते. यासाठी मोदी सरकार, प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojana) राबवत आहे. या योजनेच्या मदतीने तुम्ही सहज कर्ज घेऊ शकता. याबाबत जाणून घेवूयात सर्वकाही…

काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)

कृषी संबंधित व्यवसाय जसे मत्स्य पालन, मधमाशी पालन, कुक्कुट पालन, पशुधन पालन, ग्रेडिंग, कापणी, कृषी उद्योग एकत्रीकरण, डेयरी, मत्स्य पालन, कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र, खाद्य आणि कृषी-प्रक्रिया, इत्यादी पीएमएमवाय अंतर्गत पात्र आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे लाभार्थी : प्रोप्रायटर, पार्टनरशिप, सर्व्हिस सेक्टरच्या कंपन्या, मायक्रो उद्योग, दुरूस्ती दुकाने, खाण्यासंबंधी व्यापार, विक्रेते, ट्रक मालक, मायक्रो मॅन्युफॅक्चरिंग फर्म.

तीन कॅटेगरीत मिळते हे कर्ज

1. शिशु कर्ज योजना- यामध्ये 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

2. किशोर कर्ज योजना- यामध्ये 50,000 रुपये ते 5 लाखापर्यंत कर्ज मिळते.

3. तरुण कर्ज योजना- यामध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.

अर्ज कसा करायचा जाणून घ्या?

कर्जासाठी ओळखीचा पुरावा – वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट,
फोटो आयडी. पत्त्याचा पुरावा – टेलीफोन बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, प्रॉपर्टी टॅक्स रिसेप्ट, आधार कार्ड, पासपोर्ट. अर्जदाराचा फोटो (6 महिन्यापेक्षा जुना नसावा).
जातीचा दाखला SC/ST/OBC. ओळखीचा दाखला/ बिझनेस एंटरप्रायसेस, हे कागदपत्र आवश्यक आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जा (http://www.mudra.org.in/)

Web Title : world entrepreneurs day 2021 you can get 10 lakh rupees benefits under pmmy check details

7th pay Commission | मोदी सरकारने ‘या’ कर्मचार्‍यांना दिली 25 टक्के DA ची भेट, पण ‘या’ पध्दतीनं होईल पेमेंट, जाणून घ्या

Parambir Singh | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, खंडणीचा आणखी एक गुन्हा

Cyber Fraud मध्ये फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात परत मिळतील पैसे, जाणून घ्या पद्धत 

Related Posts