IMPIMP

Crime News | इंजिनियर भाजप नेत्याने केली दुकानात चोरी; सीसीटीव्हीत घटना झाली कैद

by nagesh
crime news | hamirpur bjp youth worker arrested hamirpur theft case

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Crime News | कोरोनाच्या संकटाने अनेकांना हालाखीच्या दिवसाला तोंड द्यावे लागत आहे. त्यातून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अशीच एक सर्वाना धक्का पोहोचवणारी घटना हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातुन समोर आली इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेल्या भाजप युवा मोर्चाच्या नेत्याने दुकानात चोरी केल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे हि सर्व घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. संबंधित नेत्याला अटक करण्यात आली असून मुकुल ठाकूर असे त्यांचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सुभाष चंद्र यांनी पोलीस ठाण्यात (Crime News) दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या युवा नेत्याने एनआयटीमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्याने दुकानातून गाडीच्या लाइट्स, डाटा केबल, मोबाईल चार्जर स्टँड आणि एलईडी लाइट्ससह १८ हजार रुपयांचं सामान चोरी केलं असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. या फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याशिवाय पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेलं सर्व सामान जप्त केलं आहे. हमीरपूर न्यायालयासमोर आरोपीला हजर करण्यात आलं असल्याचं पोलीस
अधिक्षक डॉ. आकृती शर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, मध्यप्रदेशमधील शिवराज सरकारमध्ये मंत्री असलेल्या कुंवर विजय शाह यांचा एक
व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यावरून जकारण चांगलंच तापलं आहे.या व्हिडीओमध्ये मंत्री कुंवर विजय शाह हे महिला पोलीस अधिकाऱ्याला एका मुलीकडे लक्ष ठेवण्याबद्दल सांगत आहेत. याच दरम्यान त्यांनी ही विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांच्या जातीची आहे, म्हणून हिच्याकडे लक्ष द्या” असं म्हटलं आहे.त्यामुळे या एका विधानामुळे मोठा गदारोळ झालेला पाहायला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून काँग्रेसनेही त्यावर टीकेची झोड ठवली आहे.

 

Web Title :crime news | hamirpur bjp youth worker arrested hamirpur theft case

 

हे देखील वाचा :

Crime News | कलयुग ! शेत विकून बायकोच्या खात्यात जमा केले 39 लाख, 11 रुपये ठेवून शेजार्‍यासोबत नोकरदार पत्नी फरार

Arman Kohli | ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी ‘बिग बॉस’ फेम अभिनेता अरमान कोहलीला NCB कडून अटक

JANMASHTAMI FESTIVAL 2021 | जन्माष्टमी 30 ला, जाणून घ्या केव्हापासून कुठपर्यंत असेल ‘अष्टमी तिथी’, पूजा विधी आधि शुभ मुहूर्त

 

Related Posts