IMPIMP

Arman Kohli | ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी ‘बिग बॉस’ फेम अभिनेता अरमान कोहलीला NCB कडून अटक

by nagesh
Arman Kohli | drugs connection actor arman kohli ncb custody thorough inquiry

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अमली पदार्थ विरोधी नियंत्रण कक्षाने (NCB) बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत केले आहे. एनसीबीने शुक्रवारी टीव्ही अभिनेता गौतम दीक्षितला (Gautam Dixit) अटक (Arrest) केल्यानंतर शनिवारी बॉलिवूड अभिनेता आणि बीग बॉस फेम (Bigg Boss Fame) अरमान कोहलीच्या (Arman Kohli) घरावर छापा टाकला. एनसीबीने कोहलीच्या (Arman Kohli) घरावर छापा टाकून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत त्याची चौकशी सुरु होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

एनसीबीने शनिवारी सकाळी मुंबईतून एका तस्कराला अटक केली. त्याच्याकडून त्याचा बॉलिवूडमधील काही जणांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार एनसीबीच्या एका पथकाने पश्चिम उपनगरातील अरमान कोहलीच्या घरी छापा टाकला. या छापा कारवाईत एनसीबीने अनेक वस्तू जप्त केल्या
असून अरमानला देखील ताब्यात घेतले.

 

 

दरम्यान, टीव्ही कलाकार गौरव दीक्षितला एनसीबीच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. काही महिन्यापूर्वी गौरवच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी त्याच्या घरातून एमडी (MD), ड्रग्स, चरस जप्त करण्यात आले होते. चित्रपट कलाकार एजाज खान (Ejaz Khan) याच्या चौकशीच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. एनसीबीने आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांची चौकशी केली आहे.

अटक करण्यात आलेल्या अरमान कोहली याने लोकप्रीय शो बीग बॉसमध्ये भाग घेतला होता.
बेकायदा दारुसाठा केल्याप्रकरणी त्याला यापूर्वी अटक करण्यात आली आहे. 2018 मध्ये अरमान याच्यावर त्याची लिव्ह इन गर्लफ्रेंड नीरू रंधावा (Neeru Randhawa) हिला बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी देखील त्याला अटक करण्यात आली होती. एका महिला फॅशन डिझायनर सोबत (women fashion designers) दुर्व्यवहार केल्याप्रकरणी आरमानवर वर्सोवा पोलीस ठाण्यात (Versova police station) गुन्हा (FIR) दाखल आहे.

 

Web Title : Arman Kohli | drugs connection actor arman kohli ncb custody thorough inquiry

 

हे देखील वाचा :

JANMASHTAMI FESTIVAL 2021 | जन्माष्टमी 30 ला, जाणून घ्या केव्हापासून कुठपर्यंत असेल ‘अष्टमी तिथी’, पूजा विधी आधि शुभ मुहूर्त

Pune Police | पुण्याच्या कोंढाव्यातील ‘रेश्मा’वर ‘एमपीडीए’ची कारवाई; प्रथमच सराईत महिलेला स्थानबद्ध करुन येरवडा जेलमध्ये पाठवलं

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री ठाकरेंशी बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत फडणवीसांनी केला खुलासा, म्हणाले…

 

Related Posts