IMPIMP

Kolhapur Crime | आजी रागावल्याचा राग मनात धरून 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या

by nagesh
Kolhapur Crime | after insult by grandmother young woman commits suicide in gadhingalaj kolhapur

कोल्हापूर न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Kolhapur Crime | आजी रागावल्याचा राग मनात धरून एका 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गडहिंग्लज (Gadhinglaj) याठिकाणी घडली आहे. पूजा सुरेश भुसुरी (वय,19 रा. भडगाव ता. गडहिंग्लज) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना रविवारी (8 ऑगस्ट) रोजी घडली आहे. आत्महत्या (Kolhapur Crime) नंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी, मृत पूजाचं (Pooja Bhusuri) १० वी पर्यंतचं शिक्षण झालं होतं.
रविवारी सकाळी ती नेहमीपेक्षा उशीरापर्यंत झोपली होती. खूप उशीरापर्यंत झोपल्याने आजी तिला रागावली होती.
आजीने केलेला अपमान मनाला लागल्यानंतर तरुणीने विष (Poison) प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
विष प्यायल्यानंतर काही कालावधीने पूजाला अस्वस्थ वाटू लागलं.
यामुळे नातेवाईकांनी तिला त्याच दिवशी कोल्हापूरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलॆ. दुसऱ्या दिवशी सोमवारी (9 ऑगस्ट) रोजी तिला गडहिंग्लज येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
दरम्यान, उपचार सुरू असताना, मंगळवारी 10 ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला.

 

 

या दरम्यान, केवळ उशीरापर्यंत झोपल्यामुळे रागावल्याच्या कारणातून तरुणीनं आपला जीव दिला आहे. तर,डॉ. पाटोळे यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी (police) अजून कोणतीही कारवाई केली नसून या घटनेचा अधिक तपास सुरू केलाय.

 

 

Web Title : Kolhapur Crime | after insult by grandmother young woman commits suicide in gadhingalaj kolhapur

 

हे देखील वाचा :

Pimpri Crime | ‘मला जो नडला त्याला उभ्याने तोडला’, कोयता हवेत फिरवून दहशत माजवणारा ‘कोयता भाई’ गजाआड

Radhakrishna Vikhe Patil | ‘ चंद्रकांतदादांना नाही, मात्र, राधाकृष्ण विखे आणि हर्षवर्धन पाटील यांना मिळाली अमित शहांची भेट

Yavatmal News | दुर्देवी ! हेलिकॉप्टरच्या पंखांनीच केला ‘रँचो’चा घात, प्रात्याक्षिक करताना ध्येयवेड्या तरुणाचा मृत्यू

 

Related Posts