IMPIMP

Pimpri Crime | ‘मला जो नडला त्याला उभ्याने तोडला’, कोयता हवेत फिरवून दहशत माजवणारा ‘कोयता भाई’ गजाआड

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime branch arrests two drug peddlers in Kondhwa seizes Mephedrone worth 7.5 lakhs

पिंपरी न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Pimpri Crime | हातात कोयता घेऊन परिसरात दहशत पसरवणाऱ्या ‘कोयता भाई’च्या चिंचवड (Pimpri Chinchwad Crime) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने हातात कोयता घेऊन तो हवेत फिरवून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार चिंचवड येथे मंगळवारी (दि. 10) सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. योगेश अनंता गायकवाड (वय-25 रा. नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यातील (Chinchwad Police Station) पोलीस शिपाई निवास धनंजय विधाटे (Nivas Vidhate) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आरोपी योगेश गायकवाड याच्यावर आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेशने त्याच्याजवळ विनापरवाना लोखंडी कोयता बाळगला.
आला रे आला सगळ्यांचा बाप योगेश आला, मला जो नडला त्याला उभ्याने तोडला, असे मोठ्याने ओरडत त्याने हवेत कोयता फिरवला.
लोकांना धमकी देत हनुमान स्वीटच्या दिशेने जात होता.
त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली.
याची माहिती मिळताच चिंचवड पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.
पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title : Pimpri Crime | Chinchwad Police arrest one

 

हे देखील वाचा :

Radhakrishna Vikhe Patil | ‘ चंद्रकांतदादांना नाही, मात्र, राधाकृष्ण विखे आणि हर्षवर्धन पाटील यांना मिळाली अमित शहांची भेट

Yavatmal News | दुर्देवी ! हेलिकॉप्टरच्या पंखांनीच केला ‘रँचो’चा घात, प्रात्याक्षिक करताना ध्येयवेड्या तरुणाचा मृत्यू

Pune Crime | बजाज फायनान्सलाही सायबर चोरट्यांचा ‘झटका’; कंपनीच्या नावाने आर्थिक फसवणूक केल्याने व्यवसायाला ‘फटका’

Sangli Crime | प्रेमप्रकरण? सांगलीतील 20 वर्षीय नर्सनं विषारी इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या

 

Related Posts