IMPIMP

Maharashtra Police Recruitment | ‘महाराष्ट्र पोलीस दलात 50 हजार पदे भरणार’ – गृहमंत्री

by nagesh
Maharashtra Police Recruitment | seven thousand policemen will be recruited in maharashtra police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Police Recruitment | राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी पोलिस दलातील भरतीबाबत (Maharashtra Police Recruitment) मोठी घोषणा केली आहे. आगामी काही दिवसांत 50 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter Session) शेवटच्या दिवशी (मंगळवारी) दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. (Recruitment of 50,000 posts in the police force)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

अधिवेशनादरम्यान बोलताना वळसे पाटील म्हणाले, ‘आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी 60 हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी 10 हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. आता उर्वरित 50 हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 

अखेर दिवशीच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत वळसे पाटील यांनी राज्याच्या पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे मान्य केले. तसेच, सध्या राज्यात पहिल्या टप्प्यातील 5200 पदांची भरती सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील 7 हजार पोलीस भरण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. राज्यातील पोलिसांची संख्या कमी आहे. आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती (Maharashtra Police Recruitment) करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Maharashtra Police Recruitment | maharashtra police recruitment home minister dilip walse patils big announcement 50000 posts

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात 29 वर्षीय महिलेचा विनयभंग ! डेक्कन पोलिस ठाण्यात वकिलावर गुन्हा दाखल

Pune Crime | ‘बहिणीच्या घरी नेऊन 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार’, अश्पाक बागवानला 10 वर्षे सक्तमजुरी; कोंढव्यात दाखल होता गुन्हा

Indigo New Year Sale | इंडिगो देतंय अवघ्या 1,122 रुपयात विमान प्रवासाची संधी, तात्काळ बुक करा तिकिट

 

Related Posts