IMPIMP

Nagpur Crime | नागपुरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळलेले अर्भक नर्सिंग होममधील ?

by nagesh
Maternity Leave | 60 day special maternity leave to female staff in case of death of a child soon after birth centre

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Nagpur Crime | येथील लकडगंजच्या गरोबा मैदान येथील देवडिया हॉस्पिटलजवळ असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा अर्भक तसेच बायोमेडिकल वेस्ट मिळाल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना हे अर्भक सहा वर्षांपूर्वीची असून लकडगंजच्या एका खासगी नर्सिंग होममधील असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन तसेच न्यायवैद्यक तपासातून अर्भकाबाबत खरी माहिती गोळा करण्याचे काम पोलीस करत आहेत. (Nagpur Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही पाहिले असता पोलिसांना एक भंगारवाला हे अर्भक फेकत असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ या भंगारवाल्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत क्वेटा कॉलनीतील पुरोहित नर्सिंग होमचे नाव समोर आले. पोलिसांनी पुरोहित नर्सिंग होमचे संचालक डॉ. गोकुल पुरोहित, केअर टेकर बिपीन साहू, भंगारवाला सुनील साहू यांची चौकशी केली. त्याचबरोबर कचरा उचलणाऱ्या व्यक्तींसह अनेक नागरिकांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. (Nagpur Crime)

 

डॉ. गोकुल पुरोहित यांच्याकडे केलेल्या चौकशीतून पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. डॉ. पुरोहित यांची पत्नी डॉ. यशोदा या स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. त्याचबरोबर नंदनवन येथील एका होमिओपॅथी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इन्टर्न विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास रुग्णालयात त्या मार्गदर्शन करीत होत्या. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी डॉ. यशोदा यांनी सहा अर्भक आणले होते. त्यांनी ते अर्भक रुग्णालयात सुरक्षित ठेवले होते. २०१६ मध्ये यशोदा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या वापरत असलेले साहित्य तसेच ठेवलेले होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रुग्णालयाच्या पुनर्निर्मितीस काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली. त्यावेळी डॉ. गोकुल पुरोहित यांनी काही सामान भंगार व्यावसायिक सुनील साहूला विकण्यास केअर टेकर बिपीन साहू यांना सांगितले. त्यानुसार बिपिनने सुनीलला रुग्णालयात बोलावले. त्यावेळी भंगार बरोबर बायोमेडिकल वेस्ट आणि अर्भकही सुनीलने घेतले. मिळालेले सामान कोणत्याच कामाचे नसल्याने सुनील ते सर्व महापालिकेच्या देवडिया हॉस्पिटल जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले. कचरा उचलणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात ही गोष्ट येताच त्याने काचेच्या बरणीत ठेवलेले अर्भक आणि बायोमेडिकल वेस्ट फेकून काचेची बरणी घेऊन निघून गेला. या अर्भकावर ज्यावेळी दोन युवकांचे लक्ष गेले त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला.

 

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.
अर्भक किती जुने आहे याचा तपास करण्यात येत आहे त्यासाठी शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक अहवालाचा आधार घेण्यात येत आहे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि अर्भक ठेवण्याची नर्सिंग होमला परवानगी आहे का ? याचा ही तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
नर्सिंग होममधील काही कागदपत्रांची वरिष्ठ अधिकारी तपासणी करत आहेत. महापालिकेलाही तपासासाठी पत्र देण्यात आले आहे.
अशा पद्धतीने बायोमेडिकल फेकणे गुन्हा आहे.
महत्त्वाचे म्हणजे अर्भकाची खरी माहिती मिळवणे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दरम्यान, ज्या होमिओपॅथी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Nagpur Crime | six infants found on the rubbish heap in quetta colony are from a nursing home police nagpur

 

 

हे देखील वाचा :

Vaani Kapoor Sizzling Look | फक्त शर्ट घालून वाणी कपूरनं केला फोटो शेअर, फोटोमधील सिझलिंग लूकनं चाहत्यांना केलं घायाळ

Katrina Kaif Glamorous Look | समुद्र किनारी कतरिनाचा दिसला ग्लॅमरस अंदाज, लग्नानंतर झाली अधिकच बोल्ड; पाहा व्हायरल फोटो

Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup | बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि मराठमोळा अभिनेता राकेश बापट यांचं ब्रेकअप झालं? शमिताने केला खुलासा म्हणाली…

 

Related Posts