IMPIMP

Nora Fatehi | 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED कार्यालयात पोहचली नोरा फतेही, जॅकलीनची सुद्धा पुन्हा होणार चौकशी (व्हिडीओ)

by nagesh
Nora Fatehi | nora fatehi summoned by enforcement directorate in 200 crore rupees money laundering case Video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Nora Fatehi | दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद सुकेश चंद्र शेखर (Sukesh Chandra Shekhar) द्वारे 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (200 Crore Money Laundering Case) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स पाठवले. नोराला समन्स जारी करून या प्रकरणी आज चौकशीत सहभागी होण्यास सांगण्यात आले होते, यानंता नोरा आपला जबाब नोंदवण्यासाठी ईडी कार्यालयात पोहचली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सुकेशवर केवळ नोरा फतेहीच (Nora Fatehi) नव्हे, तर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला फसवल्याचा सुद्धा आरोप आहे. नोरा फतेहीसह ईडीने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला सुद्धा पुन्हा समन्स पाठवले आहे.

ईडीने काल म्हणजे शुक्रवारी चौकशीत सहभागी होण्यासाठी जॅकलीनला MTNL येथील ईडी कार्यालयात बोलावले होते. सुकेशने जॅकलीनला सुद्धा आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता.

अनेक कलाकारांना फसवण्याचा रचला होता कट

ईडीने या प्रकरणात जॅकलीनची (jacqueline fernandez) यापूर्वी चौकशी केली होती. अगोदर ईडीला वाटत होते की जॅकलीन या प्रकरणात सहभागी आहे, परंतु नंतर समजले की, ती या प्रकरणात व्हिक्टिम आहे.

सुकेशने लीना पॉलच्या माध्यमातून जॅकलीनला (jacqueline fernandez) फसवले होते. जॅकलीनने ईडीला दिलेल्या आपल्या वक्तव्यात सुकेशसंबंधी महत्वाची माहिती दिली होती.

ईडीच्या अधिकार्‍यांनी नोराला समन्स जारी केल्यानंतर म्हटले होते की, अजून हे नक्की नाही की नोरा आज होणार्‍या चौकशीत सहभागी होणार किंवा नाही.
मात्र, नोरा (Nora Fatehi) आजच्या चौकशीत सहभागी झाली आहे.

तिहार जेलमधून 200 कोटी वसूल करण्याच्या प्रकरणात सुकेश चंद्र शेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पॉल जेलमध्ये बंद आहे.
सुकेशने इतर लोकांप्रमाणे नोरा फतेहीला सुद्धा आपल्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता.
नोरा आणि जॅकलीनशिवाय सुकेशच्या निशाण्यावर अनेक बॉलीवूड कलाकार आणि निर्माते होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

लीनाच्या मदतीने करत होता जेलमधून फसवणूक

फसवणूक प्रकरणात सुकेशची पत्नी लीना पॉलसुद्धा अटकेत आहे.
लीना फसवणुकीत सुकेशला साथ देत होती. जेलमधूनच सुकेश लीनाद्वारे फसवणुकीचे नेटवर्क चालवत होता.

अटक झाल्यानंतर लीनाने चौकशीत सांगितले की, ती सुधीर आणि जोएल नावाच्या दोन व्यक्तींसोबत मिळून फसवणुकीचे पैसे मार्गी लावत होती.

जेलचे 9 अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाई

जेलमधून आपली फसवणुकीची प्रकरणे पार पाडणारा आरोपी सुकेशच्या संबंधीत दिल्ली पोलीसांचे 9 अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर विभागीय कारवाईचे आदेश दिले गेले आहेत.

या प्रकरणात 6 अधिकारी आणि 3 कर्मचार्‍यांना अगोदरच निलंबित करण्यात आले होते. वसूली प्रकरणात हे सर्व चौकशीनंतर दोषी आढळले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title: Nora Fatehi | nora fatehi summoned by enforcement directorate in 200 crore rupees money laundering case Video

हे देखील वाचा :

Rupali Chakankar | भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वत:हूनच मान्य केलं – रूपाली चाकणकर

Udayanraje Bhosale | उदयनराजेंच्या ताफ्यात नव्या BMW 007 ची ‘एन्ट्री’

Pune Crime | पुण्यात सॉफ्टवेअर अभियंत्याचा गोळ्या झाडून खून झाल्याचे उघड; पोलिसांकडून IT इंजिनिअर च्या दोघा मित्रांना अटक, प्रचंड खळबळ

Related Posts