IMPIMP

Police Commit Suicide | राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

by nagesh
Police Commit Suicide | police constable commit suicide by shooting himself on video call crime in gadchiroli

मलकापूर/बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाइनबुलढाणा जिल्ह्यातील (Buldana District) मलकापूर (Malkapur) येथे काळीज धस्स करणारी घटना घडली आहे. मलकापूर येथील राहणाऱ्या एका पोलीस शिपायाने आपल्या वडिलांना व्हिडोओ कॉल (Video Call) करुन त्यांच्या डोळ्यादेखत आत्महत्या (Police Commit Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या पोलीस शिपायाने वडिलांसमोर स्वत:वर गोळी झाडून (Shooting Himself) आपल्या आयुष्याचा शेवट (Police Commit Suicide) केला. आपल्या मुलाचा मृत्यू डोळ्यादेखत पाहणाऱ्या वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रमोद चांगदेव शेगोकर Pramod Changdev Shegokar (वय-32) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचं (Police Commit Suicide) नाव आहे. ते मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी होते. सध्या ते गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli District) अहेरी येथील पॉवर हाऊस कॉलनीत राहण्यास होते. मृत प्रमोद यांची पत्नी देखील पोलीस दलात कार्यरत असून ताडगाव पोलीस मदत केंद्रात (Tadgaon Police Helpline Center) कार्यरत आहे. प्रमोद यांनी रविवारी रात्री आठच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

 

प्रमोद यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वडिलांना व्हिडीओ कॉल केला. बाबा तुमच्या बँक खात्यात एक लाख रुपये टाकले आहेत.
उद्या चेक करुन घ्या. तुम्ही कसे आहात, मी चांगला आहे. थोडं टेन्शन आहे, असा संवाद दोघांमध्ये झाला.
त्यावेळी प्रमोद यांनी वडिलांच्या डोळ्यादेखत व्हिडीओ कॉल सुरु असताना स्वत:वर गोळी झाडून घेतली.
मुलाने व्हिडीओ कॉलवर गोळी झाडून घेतल्याचे पाहून वडिलांना मोठा धक्का बसला.
तसेच परिसरातील लोकांना देखील धक्का बसला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद हे आठ वर्षापूर्वी पोलीस दलात रुजू झाले होते. त्यानंतर काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.
सर्वकाही सुरळीत सुरु असताना रविवारी रात्री प्रमोद यांनी आपल्या राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून घेतली.
घटनेची माहिती मिळताच अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर (Aheri Sub-Divisional Police Officer Amol Thakur) आणि अहेरीचे पोलीस ठाण्याचे (Aheri Police Station) पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे (Police Inspector Shyam Gawhane) यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पुढील तपास अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Police Commit Suicide | police constable commit suicide by shooting himself on video call crime in gadchiroli

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील ‘मटका किंग’ची ‘गेम’ करणारे 6 जण ‘गोत्यात’, खूनाचं कारण आलं समोर

MP Supriya Sule | प्राईम पॉईंट फौंडेशनचा संसदरत्न पुरस्कार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्या वर्षी जाहीर

Radiotherapy | आता कर्करोगावरील अत्याधुनिक उपचाराने हृदयविकारही बरा होणार; जाणून घ्या कसे

 

Related Posts