पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | व्यवसायासाठी ७ लाख ४५ हजार रुपये कर्ज घेतले असताना त्यावर १२ टक्के व्याज लावून जबरदस्तीने पैसे घेतले. त्यावर ४ लाख १५ हजार रुपये व्याजापोटी दिले असतानाही १२ टक्के प्रमाणे एकूण २२ लाख रुपयांची मागणी करुन धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) बेकायदेशीर सावकारी करणार्या आशिष पाटणे Money Lender Ashish Patne (रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. याप्रकरणी आय बी एम रोडवर राहणार्या एका ३२ वर्षाच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी सर्व प्रथम पहिल्यांदा आशिष पाटणे याच्याकडून ४५ हजार रुपये घेऊन व्याज व मुद्दलासह ५५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर व्यवसायासाठी वेळोवेळी ऑनलाईन वेगवेगळ्या ठिकाणी ७ लाख ४५ हजार रुपये सप्टेबर २०२० मध्ये घेतले होते.
आरोपीने पहिल्या महिन्याचे व्याज कपात करुन बाकी पैशाचे १२ टक्के व्याज लावून फिर्यादीकडून जबरदस्तीने पैसे घेतले. तसेच फिर्यादी हे वेळेवर पैसे देऊ न शकल्याने आरोपी याने फिर्यादी यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी आतापर्यंत व्याजापोटी ४ लाख १५ हजार रुपये दिले असता तरी आरोपीने १२ टक्के प्रमाणे २२ लाख रुपये देण्याबाबत धमकी (Pune Crime) दिली आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मधाळे (API Madhale) तपास करीत आहेत.
यापुर्वीच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी नागरिकांना खासगी सावकाराविरूध्द तक्रार करता यावी म्हणून हेल्पलाइन सुरू केली आहे. 9145003100 हा हेल्पलाईनचा क्रमांक (Pune Police Helpline Number) असून यावर व्हॉट्सअॅपव्दारे तक्रार नोंदवता येणार आहे.
Web Title :- Pune Crime | Crime against Money Lender Ashish Patne in Kondhwa Police Station
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update
- ST Workers Strike | ‘माझ्या संपकरी एसटी कर्मचार्यांनो…विलीनीकरणाचे डोक्यातून काढून टाका’ – अजित पवार
- Aadhaar Card Update | बाळ जन्माला येताच बर्थ सर्टिफिकेटच्या अगोदर मिळेल आधार कार्ड, जाणून घ्या होणार कोणते बदल
- Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा जावे लागेल जेलमध्ये; जाणून घ्या