IMPIMP

Aadhaar Card Update | बाळ जन्माला येताच बर्थ सर्टिफिकेटच्या अगोदर मिळेल आधार कार्ड, जाणून घ्या होणार कोणते बदल

by bali123
Aadhaar Card Update | aadhar card before birth certificates to newly born kids in hospital soon these changes to take place know here

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Aadhaar Card Update | लवकरच मुलांच्या जन्मासोबतच त्यांना आधार कार्ड मिळेल. यासाठी UIDAI ने तयारी सुरू केली आहे. सध्या मुलांच्या जन्मानंतर सर्वप्रथम त्यांचा जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट (Birth Certificate) तयार केले जाते. परंतु आता बर्थ सर्टिफिकेटच्या अगोदर नवजात बाळाला आधार कार्ड नंबर मिळेल. (Aadhaar Card Update)

 

बर्थ सर्टिफिकेट मिळण्यास जवळपास 1 महिन्याचा वेळ लागतो. मुलाने जन्म घेतल्यानंतर हॉस्पिटलमध्येच आधार कार्ड बनवण्यासाठी एनरोलमेंट प्रक्रिया सुरू केली जाईल. ज्यानंतर बर्थ सर्टिफिकेटच्या अगोदर मुलाचे आधार कार्ड (Biometric Aadhaar Card) जारी केले जाईल.

 

जन्मासोबतच मुलाला आधार

या योजनेच्या तयारीसाठी बर्थ रजिस्ट्रारसोबत चर्चा सुरू आहे. UIDAI च्या ताज्या आकड्यांनुसार 99.7% प्रौढ लोकसंख्या आधारसोबत जोडली गेली आहे. देशातील 131 कोटी लोकसंख्येकडे आधार नंबर आहे.

 

आता नवजात बाळांना आधार कार्ड देण्याची तयारी सुरू आहे. देशात दरवर्षी अडीच कोटी बालके जन्म घेतात. अशावेळी आधार सोबत मुलांना एनरोल करण्याची प्रोसेस सुरू केली जाईल. ज्यानंतर मुलांच्या जन्मासोबतच त्यांचा फोटो क्लिक करून त्यांना आधार सोपवले जाईल.

 

5 वर्षापेक्षा कमी वयासाठी आवश्यक नाही बायोमॅट्रिक्स

मोठ्यांचे आधार बनवण्यासाठी बायोमॅट्रिक्सची मदत घेतली जाते, परंतु मुलांच्या बाबतीत 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे बायोमॅट्रिक्स घेतले जात नाही. ही स्थिती लक्षात घेऊन मुलांच्या आई-वडिलांपैकी एकासोबत मुलाला जोडले जाईल. (Aadhaar Card Update)

 

5 वर्षाचे वय ओलांडल्यानंतर मुलाचे बायोमॅट्रिक्स घेतले जाईल.
UIDAI चा प्रयत्न आहे की पूर्ण लोकसंख्येला आधार कार्डसोबत जोडले जावे.
हा प्रयत्न यशस्वी झाला तर मोठ्यांसोबत नवजात मुलांचे सुद्धा स्वताचे आधार कार्ड असेल.

 

Web Title : Aadhaar Card Update | aadhar card before birth certificates to newly born kids in hospital soon these changes to take place know here

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts