IMPIMP

Pune Crime | पिंपरी चिंचवड पोलिसांचा परराज्यातील अट्टल दरोडेखोरांसोबत ‘थरार’, 6 आरोपीं ताब्यात; एक पोलीस जखमी

by nagesh
CP Krishna Prakash | Action taken by Commissioner of Police IPS Krishna Prakash!senior police inspector who ignored the complaint attached to control room and an employee who collected the installment

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | मध्य प्रदेशातील अट्टल दरोडेखोरांना (Criminals in MP) पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) अंगावर गाड्या घालून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) उर्से टोलनाक्यावर (Urse Toll Plaza) घडली आहे. या घटनेत एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह (Senior Police Officers) पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अट्टल दरोडेखोर दोन मोटारीतून पुणे-मुंबई महामार्गावरुन (Pune-Mumbai Highway) जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी उर्से टोल नाक्यावर सापळा रचला. सकाळी साडेअकराच्या सुमारास संशयित वाहन टोल नाक्यावर पुढे सरकत होते. त्यावेळी सापळा रचलेल्या पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

पोलीस पकडण्यासाठी आल्याचे पाहून आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी जीवाची पर्वा न करता दोन गाड्यांमधील सहा आरोपींना ताब्यात घेतले. तर आरोपींचे इतर साथिदार डोंगरामध्ये पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे (Crime Branch) सर्व पथकातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला. घटनास्थळी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Addl CP Dr. Sanjay Shinde) दाखल झाले आहेत. (Pune Crime)

 

 

Web Title :- Pune Crime | pimpri chinchwad police clash with criminals of madhya pradesh at Urse Toll Plaza

 

हे देखील वाचा :

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी खुशखबर ! आता ATM मधून फसवून कोणीही काढू शकणार नाही पैसे

Pune Lohegaon Airport | लोहगाव विमानतळावरील रनवे पासूनच काही अंतरावरील खड्ड्यामध्ये सांडपाणी; उघड्यावरील सांडपाणी व्यवस्थेमुळे ‘विमानांना’ धोका

Coronavirus | ‘कोरोना’वर नैसर्गिक प्रतिकारशक्ती लसीपेक्षाही अधिक प्रभावी; अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासाचा निष्कर्ष

 

Related Posts