IMPIMP

Pune Crime | द्रुतगती मार्गावर लघुशंकेसाठी थांबले अन् दरोडेखोरांनी गाठले, ट्रक चालकला लुटणाऱ्या 5 जणांच्या टोळीला अटक

by nagesh
Pune Crime | Two arrested in Ashti for Painter Murder Case Manjri Pune Police Crime News

तळेगाव दाभाडे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रकचालकाला व त्याच्या भावाला चाकू व कोयत्याचा धाक
दाखवून लुटले (Robbery) तसेच मारहाण (Beating) केल्याची घटना पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) घडली. आरोपींनी
मोबाईल व रोकड असा 19 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी (Pune Crime) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) 5 जणांवर 395,506 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम (Maharashtra Police Act) 37(1)(3) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी आदर्श अनिल चौधरी (Adarsh Anil Chaudhary), अजय गुलाब साळुंके (Ajay Gulab Salunke), संजय मारुती चव्हाण (Sanjay Maruti Chavan), गणेश राजू काळे (Ganesh Raju Kale) आणि अमृत रवी जाधव (Amrit Ravi Jadhav) यांना अटक केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी जमाल कमल खान Jamal Kamal Khan (वय – 27 रा. चार रस्ता , वापी, गुजरात (Gujarat) मुळ रा. जि. चंदवली उत्तर प्रदेश – (Uttar Pradesh) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या शिरगाव पोलीस चौकीत (Shirgaon Police Chowki) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आदर्श अनिल चौधरी (वय – 19 रा. वर्सोली, लोणावळा), अजय गुलाब साळुंके (वय – 19 रा.दत्तवाडी, ता. मुळशी), संजय मारुती चव्हाण (वय – 22 रा. बारा बंगल्याजवळ, लोणावळा – Lonavla), गणेश राजू काळे (वय – 22 रा. चव्हाण नगर, वडगाव Wadgaon ता. मावळ) आणि अमृत रवी जाधव (वय – 18 रा. पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे, दत्तवाडी – Dattawadi, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. हा प्रकार पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से गावच्या हद्दीतील फुड मॉल जवळ सोमवारी (दि.11) पहाटे साडेचारच्या सुमारास घडला. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चालक व त्यांचा भाऊ अफताब हे पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरुन जात होते. उर्से गावच्या (Urse Village) हद्दीत असलेल्या फुड मॉलच्या (Food Mall) विरुद्ध दिशेला ट्रक थांबवून फिर्यादी लघुशंकेसाठी ट्रकमधून खाली उतरले. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या भावाला चाकू व कोयत्याचा धाक दाखवून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपींनी मोबाईल व रोख रक्कम असा 19 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Pimpri chinchwad police talegaon dabhade arrested five criminals for robbing truck driver

 

हे देखील वाचा :

Kishori Pednekar | ‘कमळातला हा चिखल गेला कुठे?’; किशोरी पेडणेकरांचा सोमय्यांवर निशाणा

Pune Crime | ब्राऊन शुगर बाळगणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेकडून अटक, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

Multibagger Penny Stock | 6 रुपयांच्या शेयरने बदलले गुंतवणुकदारांचे नशीब, 1 लाखाचे झाले 94 लाख रुपये

 

Related Posts