IMPIMP

Pune Kondhwa Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कोंढवा परिसरातील घटना

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship)प्रस्थापित केले. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणावर कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल ते जून 2023 या दरम्यान पीडित मुलीच्या घरात घडला आहे.

याबाबत 17 वर्षीय मुलीने गुरुवारी (दि.28) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन समीर शेख उर्फ सोनू (रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 506, पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्या सोबत बोलण्याच्या बहाण्याने बिल्डिंगच्या नळावर येऊन जवळीक साधली. (Pune Rape Case)

त्यानंतर पीडित मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून जबरदस्तीने घरात घुसला. मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार आरोपीला समजल्यानंतर त्याने मुलीला याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारुन टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pune Katraj Crime | पुणे : दहावीचा पेपर देऊन निघालेल्या तरुणावर हत्याराने वार

Related Posts