IMPIMP

Pune Parvati Crime | पुणे : अल्पवयीन मुलीला धमकी देऊन बलात्कार, दोघांना अटक

by sachinsitapure

पुणे : Pune Parvati Crime | संबंधाची माहिती घरच्यांना सांगण्याची धमकी देऊन 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. याप्रकरणी 20 वर्षाच्या तरुणाला व त्याला मदत करणाऱ्या साथीदाराला पर्वती पोलिसांनी (Parvati Police Station) अटक केली आहे. हा प्रकार मे 2023 ते 15 मार्च या कालावधीत पीडित मुलीच्या राहत्या घराजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घडला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

याबाबत पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या 32 वर्षीय आईने शुक्रवारी (दि.15) पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन संकेत मल्हारी शिंदे (वय-20), विजय यल्लाप्पा नारायणकर (वय-25), यश राजेंद्र जाधव (वय-26 तिघे रा. जनता वसाहत, पुणे) यांच्यावर आयपीसी 376/2/जे/एन, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन संकेत शिंदे व यश जाधव यांना अटक केली आहे.(Pune Parvati Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील संकेत शिंदे याने
तिला लग्नाचे आमिष दाखवले. माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून तिला
भेटण्यासाठी बोलावून घेतले. तसेच भेटण्यासाठी आली नाहीस तर आपल्यात यापूर्वी झालेल्या संबंधाची माहिती
तुझ्या घरच्यांना देईन अशी धमकी दिली. पीडित मुलगी संकेत याला भेटण्यासाठी गेली असता त्याने पत्र्याच्या
शेडमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तर विजय आणि यश यांनी आरोपी संकेत
याला मदत केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घावटे करीत आहेत.

Pune Crime News | पुणे: कॅम्प, कात्रज, धायरी व वडगाव शेरी परिसरात घरफोडी, सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास

Related Posts