IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime | मुंबई पोलीस उपायुक्ताच्या नावाने महिलेला लाखोंचा गंडा, पिंपरी चिंचवडमधील प्रकार

by nagesh
Pune Crime News | Pune-Somwar Peth Crime News : Samarth Police Station - Fraud of 81 lakh 50 thousand FIR On Dnyaneshwar Laxman Ghadge of Incomeroute – Investment & Fianancial Services

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Pimpri Chinchwad Crime | सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) नागरिकांना लुबाडण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करत असतात. मात्र, आता थेट पोलीस उपायुक्तांचे (DCP) नाव घेऊन एका महिलेला तब्बल पावणे पाच लाखांचा गंडा (Cheating) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) रावेत येथे 27 मार्च 2023 रोजी सव्वापाच ते साडेसात या कालावधीत घडला. आयपीएस अधिकाऱ्याच्या (IPS Officer) नावाचा वापर करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी एका महिलेने सोमवारी (दि.3) रावेत पोलीस ठाण्यात (Rawet Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 9368317294 या क्रमांकाच्या मोबाईल धारकावर आयपीसी 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन करुन तो आयपीएस अधिकारी अजयकुमार बन्सल (IPS Ajay Kumar Bansal) बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या आधार कार्डच्या (Aadhaar Card) नंबरचा व आधार कार्डच्या फोटोचा आंतरराष्ट्रीय दहशतवादासाठी (International Terrorism) गैरवापर होऊ शकतो. तुमच्या बँक खात्यावरुन सहा व्यवहार झाले असून त्यांचा गैरवापर झाला असल्याचे आरोपीने सांगितले.

 

आरोपीने महिलेचा विश्वास संपादन करुन संशयित सहा व्यवहारांची तपासणी करण्यासाठी प्रत्येकी 98 हजार 326 रुपये सिक्युरिटी म्हणून मागितले. त्यानंतर 5 लाख 89 हजार 956 रुपये दोन बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने रावेत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

कोण आहेत अजयकुमार बन्सल?

अजयकुमार बन्सल हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत.
बन्सल यांनी नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या गडचिरोली येथे काही वर्षे काम केले.
त्यानंतर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले.
गेल्यावर्षी त्यांची बदली सातारा येथून मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | 6 lakhs fraud by using name deputy commissioner of mumbai police ajaykumar bansal

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | जयंत पाटलांचे देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, म्हणाले – ‘पुढील 48 तासांत…’

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! सिंहगड इलेव्हन संघाची विजयी सलामी

Maharashtra Politics News | उद्धव ठाकरेंच्या ‘फडतूस गृहमंत्री’ वक्तव्यावरुन भाजप नेते आक्रमक, म्हणाले -‘आमचे गृहमंत्री ‘फडतूस’ नाही ‘काडतूस’ आहेत’

 

Related Posts