IMPIMP

Pune Wanwadi Crime | भररस्त्यात महिलेला अश्लील बोलून जीवे मारण्याची धमकी, वानवडी परिसरातील घटना

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Wanwadi Crime | भाजी आणण्यासाठी जात असलेल्या महिलेचा दोन टवाळखोरांनी दुचाकीवरुन पाठलाग करुन गैरवर्तन केले. तसेच ‘फिक्स खून’ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रामटेकडी येथील स्मशानभूमी समोर घडला आहे. याप्रकरणी दोघांवर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 30 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि.26) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरून शफीक खलील शेख Shafiq Khalil Shaikh
(वय- 25 रा. रामटेकडी) व तौफीक शेख (वय-22 रा. सय्यदनगर) यांच्यावर आयपीसी 509, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला भाजी आणण्यासाठी जात असताना आरोपी अॅक्टीव्हा गाडीवरुन आले. पाठिमागे बसलेल्या शफीक शेख याने महिलेसोबत अश्लील बोलून गैरवर्तन केले. तसेच फिक्स खून असे ओरडून जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मोबाईल क्रमांक मागून विनयभंग
पुणे : सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीने महिलेकडे मोबाईल क्रमांक मागितला. मात्र, महिलेने मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिल्याने तिच्यासोबत असभ्य वर्तन करुन तिचा विनयभंग केला (Molestation Case). याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दमदाटी केली. हा प्रकार चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshrungi Police Station) हद्दीत सोमवारी (दि.25) घडला आहे. याबाबत 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. यावरुन ओंकार सुनील वाईकर (Omkar Sunil Waikar) याच्यावर आयपीसी 354, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

IPL 2024 | आयपीएलची अंतिम लढत रंगणार चेन्नईत, मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचे वेळापत्रक जाणून घ्या

Related Posts