IMPIMP

Pune Warje Malwadi Police | वारजे माळवाडी पोलिसांकडून मोक्क्यातील दोन फरार आरोपींना अटक

by sachinsitapure

पुणे :   Pune Warje Malwadi Police | मोक्का गुन्ह्या दाखल झाल्यानंतर एक महिना फरार (Abscond In MCOCA Case) असलेल्या टोळी प्रमुखासह दोघांना वारजे माळवाडी पोलीसांनी अटक केली आहे (Pune Police MCOCA Action). पोलिसांनी टोळी प्रमुख असलेल्या आरोपीला वारजे परिसरातून तर त्याच्या साथीदाराला सोलापूर (Solapur) येथून अटक केली आहे. टोळी प्रमुख आरोपी गणेश ऊर्फ गुड्या अनिल पटेकर (वय २२ रा. पहिली कमान दांगट पाटील नगर, शिवणे पुणे), निलेश ऊर्फ निलू मनोज एडके (वय २२ वर्षे, रा. अचानक चौक, रामनगर, वारजे पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात 23 फेब्रुवारी रोजी आयपीसी ३२६, १४३, १४७, १४९, ३३६, ३२३, ५०४, ५०६, ४२७, आर्म ॲक्ट कलम ४(२५), सह क्रिमीनल अमेंडमेन्ट लॉ ॲक्ट कलम ७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात १३५, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (।।), ३(२) व ३(४) कलमाचा अंतर्भाव करण्यात आला होता.

दाखल मोक्का गुन्ह्यातील दोन आरोपींचा पोलीस शोध घेत असताना मंगळवारी (दि.19) तपास पथकातील पोलीस अंमलदार बंटी मोरे व अमोल सुतकर यांना माहिती मिळाली की, मोक्का गुन्ह्यतील पाहिजे आरोपी निलेश ऊर्फ निलु मनोज एडके हा त्याचे मुळगावी रंगभवन चर्च जवळ, सोलापूर येथे आहे. मिळालेल्या माहितीवरून तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते, पोलीस हवालदार प्रदिप शेलार, पोलीस कॉन्स्टेबल विजय मुरुक, प्रतिक मोरे व अजय कामठे यांनी सदरबझार पोलीस स्टेशन, सोलापूर शहर कार्यक्षेत्रातील रंगभवन चर्चमागे, हार्टलाईन कंम्पाउंड, येथे जावून फरार असलेला निलेश ऊर्फ निलू मनोज एडके याला शिताफिने ताब्यात घेतले आहे.

तसेच बुधवारी (दि.20) सायंकाळी गुन्ह्यतील पाहिजे असलेला टोळी प्रमुख आरोपी गणेश ऊर्फ गुड्या अनिल पटेकर
हा वाराणसी सोसायटी, वारजे येथे त्याचे मित्राकडे पैसे घेण्याकरीता येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रदिप शेलार व अजय कामठे यांना मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, भुजंग इंगळे, विजय भुरुक, बंटी मोरे, संभाजी दराडे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे यांनी त्यांची ओळख लपवून सापळा रचून टोळी प्रमुख आरोपी गणेश ऊर्फ गुड्या अनिल पटेकर ताब्यात घेतले आहे.

एक महिन्यापासून मोक्कयामधून फरार असणारा टोळी प्रमुख गणेश ऊर्फ गुड्या अनिल पटेकर व त्याचा टोळी सदस्य
निलेश ऊर्फ निलु मनोज एडके या दोघांना तपास पथकाने शिताफिने ताब्यात घेवून अटक केलेली आहे.
अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele) हे करत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त प्रविण पवार
(IPS Pravin Pawar), अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil),
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३ संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam), सहायक पोलीस आयुक्त,
कोथरुड विभाग भिमराव टेळे यांचे आदेशाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे
(PI Manoj Shedge), पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप (PI Nilkanth Jagtap) यांचे मार्गदर्शनाखाली
तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते (API Ranjit Mohite), पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर
पार्वे (PSI Rameshwar Parve) तसेच अंमलदार पोलीस हवालदार प्रदिप शेलार, भुजंग इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल
विजय भुरुक, बंटी मोरे, दक्ष पाटील, मनोज पवार, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, शिरीष गावडे,
अजय कामठे व सत्यजित लोंढे, अमोल सुतकर यांच्या पथकाने केली.

Lok Sabha Election 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारात मतदान जनजागृती

Related Posts