IMPIMP

Pune Yerawada Crime | पुणे : दारुच्या नशेत मित्राच्या छातीत भोसकला चाकू, आरोपीला अटक

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Yerawada Crime | दारु पीऊन सोसायटीत आरडा ओरडा करणाऱ्या मित्राला शांत राहण्यास सांगितले. याचा राग आल्याने मित्रासोबत वाद घालून भाजी कापण्याचा चाकू मित्राच्या छातीत भोसकून गंभीर जखमी केले. याप्रकरणी आरोपीला येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.26) रात्री दीडच्या सुमारास कल्याणी नगर येथील मुळीक कॉम्प्लेक्सच्या (Mulik Complex Kalyani Nagar) पाचव्या मजल्यावर घडला.

याबाबत प्रथमेश संजय कांबळे (वय-20 रा. मुळीक कॉम्प्लेक्स, रामवाडी जकात नाका, कल्याणी नगर, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन तेजस उर्फ गणेश शंकर डोरके (वय-23 रा. मुळीक कॉम्प्लेक्स, रामवाडी) याच्यावर आयपीसी 326, 323 महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे मुळीक कॉम्प्लेक्सच्या सातव्या मजल्यावर राहतात. मंगळवारी रात्री ते दोघे दारु पिऊन ते इमारतीच्या परिसरात आले. आरोपी तेसज डोरके याने आरडा ओरडा करण्यास सुरवात केली. त्यावेळी इमारतीत राहत असलेल्या रॉबर्ट जडसन यांनी दोघांना आरडा ओरडा करु नका असे सांगितले. त्यामुळे प्रथमेश याने तेजसला शांत राहण्यास सांगून सातव्या मजल्यावर गेले.

त्याठिकाणी दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची होऊन वाद झाले. त्यावेळी प्रथमेश याने पाचव्या मजल्यावर राहणारा मित्र निखिल याला फोन करुन तेजसला समजावून सांगण्यास सांगितले असता त्याने दोघांना पाचव्या मजल्यावर येण्यास सांगितले. प्रथमेश निखिल याच्याकडे जात असताना आरोपी त्याच्या मागे आला. त्याने निखिलच्या घरासमोर प्रथमेश सोबत वाद घालून मारहाण केली. तसेच भाजी कापण्याचा चाकू प्रथमेशच्या बरगड्यात भोसकून गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील (PSI Swapnil Patil) करीत आहेत.

Arrest In Vehicle Theft | दुचाकी चोरट्यांना दिघी पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त

Related Posts