IMPIMP

Jamai 2.0 Web Series मध्ये परफेक्ट बिकिनी बॉडीसाठी निया शर्मानं 2 दिवस केलं होतं ‘हे’ काम ! अभिनेत्रीनं केला खुलासा (Photos)

by sikandershaikh
nia-sharma

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Jamai 2.0 Web Series | टीव्हीवरील सुंदर नागिन अॅक्ट्रेस निया शर्मा (Nia Sharma) फक्त अभिनय नाही तर आपल्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. निया युथमध्ये खूपच फेमस आहे. जेव्हा फॅशन इंडस्ट्रीबद्दल बोललं जातं तेव्हा निया शर्माचं नाव येणार नाही असं होतच नाही. निया आपल्या हॉट लुकमुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. नियाचे बोल्ड बिकिनीतील फोटो व व्हिडीओ सोशलवर खूपदा व्हायरल झाले आहेत. पुन्हा एकदा नियानं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी तिनं तिच्या स्टनिंग बिकिनी बॉडीमागील सत्य चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

निया सध्या तिची वेब सीरिज जमाई 2.0 च्या दुसऱ्या सीजनमुळं चर्चेत आहे. या शोमध्ये ती रवी दुबे सोबत काम करताना दिसणार आहे. शोमध्ये तिनं ब्लॅक बिकिनी घातल्यानं ती खूप ट्रोल झाली होती. बिकिनीतील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाले होते. आता तिनं स्टनिंग बिकिनी बॉडीमागील सत्य सांगितलं आहे. स्टनिंग बिकिनी बॉडीसाठी तिनं दोन दिवस काहीच खाल्लं-पिल्लं नव्हतं. शोसाठी तिला परफेक्ट शॉट द्यायचा होता असं तिनं सांगितलं आहे.

एका मुलाखतीत नियानं बिकिनी शुटवर भाष्य केलं. ती म्हणाली, बिकिनी शुटच्या 2 दिवस आधी तिनं खाणं-पिणं बंद केलं होतं. इतकंच नाही तर सीन्स बद्दल विचार करून तिल वेड लागेल असं वाटत होतं. शोमध्ये तिला बिकिनी घालायची होती. यासाठी तिला परफेक्ट दिसायचं होतं. यासाठी तिनं बॉडीवर खूप कष्ट घेतले. यानंतर तिनं ब्लॅक बिकिनी शुट करत फोटो सोशलवर शेअर केले होते. जे प्रचंड व्हायरल झाले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच निया रवि दुबेचा सुपरहिट शो जमाई 2.0 या वेब
सीरिजच्या (Jamai 2.0 Web Series) दुसऱ्या सीजनमधून वापसी करणार आहे.
2010 साली आलेल्या काली : एक अग्निपरीक्षा या मालिकेतून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
एक हजारों में मेरी बहना है आणि जमाई राजा या मालिकांनी तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे.
नागिन 4 मालिकेतही तिनं काम केलं आहे.
फियर फॅक्टर, खतरों के खिलाडी सिजन 8 मध्ये निया दिसली होती.
याशिवाय नियानं ट्विस्टेड (Twisted) या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
आशियातील सर्वात सेक्सी महिलांच्या यादीत नियानं 2016 साली तिसरं तर 2017 साली दुसरा क्रमांक पटकावला होता. तेव्हा पासून तिला सेक्सी लेडीचा टॅग लागला आहे.

Related Posts