IMPIMP

Auto Debit Payment System | 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम होत आहे लागू, बँक अकाऊंटमध्ये मोबाइल नंबर करून घ्या अपडेट; जाणून घ्या ADPS बाबत

by nagesh
Debit Card Fraud | how to prevent debit card frauds know step by step process

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Auto Debit Payment System | 1 ऑक्टोबरपासून (from October 1) ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम (Auto debit payment system) लागू होत आहे. अशावेळी बँक खातेधारकांनी आपल्या अकाऊंटमध्ये मोबाइल नंबर (mobile number) आवश्यक अपडेट (update) केला पाहिजे. कारण तुमच्या मोबाईल नंबरवरच ऑटो डेबिटसंबंधी नोटिफिकेशन (notification) एसएमएसद्वारे (via SMS) पाठवले जाईल.

 

यासाठी आहे ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम

ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम लागू झाल्यानंतर वीजबिल, पाण्याचे बिल, गॅसचे बिल, लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) किंवा इतर कोणता खर्च ऑटो डेबिट मोडमध्ये टाकले आहे तर ठरलेल्या दिवशी खात्यातून पैसे कापले जातील. यासाठी मोबाइल अ‍ॅप्लीकेशन किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये एखादा खर्च ऑटो डेबिट मोडमध्ये टाकावा लागेल.

 

पाच दिवस अगोदर येईल एसएमएस

नियमानुसार पेमेंट ड्यू डेटच्या पाच दिवस अगोदर ग्राहकांना एसएमएसद्वारे पेमेंटची माहिती दिली जाईल. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, मोबाइल अ‍ॅप्लीकेशन किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऑटो डेबिट करण्यापूर्वी ग्राहकांना विचारले जाईल की त्यांना पेमेंट करायचे आहे किंवा नाही.

 

तर ओटीपी असेल आवश्यक

यात फ्रॉडचे प्रकार सुद्धा समोर येत आहेत. ही समस्या संपवण्यासाठीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा बदल करत आहे. यासाठी 1 ऑक्टोबरपासून नोटिफिकेशनवर ग्राहकाची मंजूरी आणि 5000 पेक्षा जास्तच्या पेमेंटवर ओटीपी आवश्यक होणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

बँकांना दिली होती डेडलाईन

याच्याशी संबंधित फ्रेमवर्क पूर्णपणे अवलंबण्यासाठी बँका आणि इतर कंपन्यांना वेळ दिला गेला
होता, जो सप्टेंबरपर्यंत आहे. बँकांना सक्त इशारा दिला आहे की त्यांनी या नवीन सिस्टममध्ये स्वताला कन्व्हर्ट करावे.

 

तर आरबीआय करणार कारवाई

याकडे कुणी दुर्लक्ष केले तर कठोर कारवाई केली जाईल. ही सिस्टम केवळ डेबिट आणि क्रेडिट
कार्डशिवाय वॉलेट आणि युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (णझख) ट्रांजक्शन्सवर सुद्धा लागू होणार
आहे.

 

Web Title : Auto Debit Payment System | auto debit payment system is being implemented from october 1 get the mobile number updated in the bank account

 

हे देखील वाचा :

Indian Railway | रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी ! आता तुमच्या कन्फर्म तिकिटावर दुसरा प्रवाशी सुद्धा करू शकतो प्रवास, जाणून घ्या कसे

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 168 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना 100 कोटी वसुली प्रकरणात क्लिनचिट?, CBI नं दिलं स्पष्टीकरण

 

Related Posts