IMPIMP

PM Kisan | तुम्ही सुद्धा केले नसेल PM Kisan साठी रजिस्ट्रेशन तर तात्काळ करा ‘हे’ काम, अन्यथा 6000 रुपयांचे होईल नुकसान; जाणून घ्या

by nagesh
PM Kisan | 4000 rupees will be credited in farmers account-after 18 days check details PM Kisan Samman Nidhi Yojana Modi Government Marathi News

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan | जर तुमच्या खात्यात अजूनपर्यंत पीएम किसान सम्मान निधी (PM Kisan samman nidhi) चे पैसे आले नसतील, किंवा तुम्ही अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर सहज करू शकता. या स्कीम अंतर्गत सरकार देशातील शेतकर्‍यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देते. शेतकरी कशा प्रकारे पीएम किसान सम्मान निधीमध्ये आपले नाव रजिस्टर करू शकतात, ते जाणून घेवूयात.

ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया (Online registration process)

या योजनेत रजिस्ट्रेशन करणे सोपे आहे. घरबसल्या ऑनलाइन ही प्रोसेस पूर्ण करता येते. तसेच ग्रामसेवक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे या योजनेसाठी अप्लाय करू शकता.

अशा प्रकारे करू शकता रजिस्ट्रेशन

-पीएम-किसानच्या पोर्टल (pmkisan.gov.in) वर क्लिक करा.

-याच्या फार्मर कार्नरच्या NEW FARMER REGISTRATION च्या पयार्यावर क्लिक करा.

-यानंतर जी विंडो ओपन होईल त्यामध्ये आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाका.

-यानंतर क्लिक हियर टू कंटिन्यूवर क्लिक करा.

-यामध्ये फॉर्म दिसेल, तो पूर्ण भरा.

-तो भरून सेव्ह करा. आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुढील हप्त्यासाठी द्यावी लागेल ही माहिती

2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत नवीन रजिस्ट्रेशन करणार्‍या शेतकर्‍यांना आता अर्जात आपल्या जमीनचा प्लॉट नंबर सुद्धा सांगावा लागेल. मात्र, नवीन नियमाचा प्रभाव योजनेतील जुन्या लाभार्थ्यांवर पडणार नाही.

हप्ता आला नसेल तर या नंबरवर करा तक्रार

PM Kisan Scheme योजनेच्या हप्त्याची माहिती घेण्यासाठी टोल फ्री नंबर 1800115526 वर कॉल करून तक्रार करू शकता. कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यासाठी किंवा तक्रार, चौकशीसाठी हेल्पलाईन नंबर 155261 किंवा Toll Free नंबर 1800115526 वर सुद्धा कॉल करू शकता. तसचे कृषी मंत्रालयाकडून जारी नंबर 011-23381092 वर सुद्धा कॉल करू शकता.

Web Title : PM Kisan | you get 6000 rupees in pm kisan samman nidhi scheme check step by step registration process

हे देखील वाचा :

Municipal Corporation Election | निवडणूक आयोगाकडून राज्यातील 18 महापालिकेच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश

Parambir Singh | परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगासमोर हजर होण्यासाठी बजावला चौथा समन्स

Nashik News । ते छत्रपती आहेत का? फडणवीसांच्या टीकेला नाशिकच्या पोलिस आयुक्तांचं उत्तर

Related Posts