IMPIMP

SBI मध्ये उघडा ‘हे’ विशेष खाते, जेव्हा शक्य होईल तेव्हा जमा करा पैसे; मिळेल चांगले व्याज

by nagesh
SBI SO Recruitment 2022 | state bank of india recruitment specialist officer posts know salary and other details official notification

नवी दिल्ली : वृत्तसंस्था एसबीआय (SBI) ची फ्लेक्सी डिपॉझिट स्कीम (SBI Flexi Deposit Scheme) रिकरिंग डिपॉझिट (RD) सारखी एक स्कीम आहे, परंतु यामध्ये पैसे जमा करण्याची सूट मिळते. म्हणजे एका वेळी अनेक महिन्यांचे इन्स्टॉलमेंट भरू शकता. या स्कीममध्ये इन्स्टॉलमेंट अमाऊंट फिक्स नाही. ग्राहक आपल्या हिशेबाने इन्स्टॉलमेंटची रक्कम कमी-जास्त करू शकतो. या स्कीमबाबत जाणून घेवूयात सर्वकाही…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

किती करू शकता गुंतवणूक

SBI फ्लेक्सी डिपॉझिट खाते उघडल्यानंतर तुम्ही मिनिमम 5000 जमा करू शकता. एका इन्स्टॉलमेंटसाठी मिनिमम अमाऊंट 500 रुपये आहे. यामध्ये दरवर्षी कमाल 50,000 पर्यंत जमा करता येऊ शकतात. यामध्ये महिन्यात तुम्ही कधीही पैसे जमा करू शकता.

 

 

मॅच्युरिटी पीरियड

SBI Flexi Deposit स्कीम किमान कालावधी 5 वर्ष आणि कमाल 7 वर्ष आहे. यावर मिळणारे व्याज फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणार्‍या व्याजाइतके असते. वेळेपूर्वी जर तुम्ही हे खाते बंद केले तर तुम्हाला काही दंड भरावा लागू शकतो.

 

 

कसे उघडायचे खाते?

हे खाते तुम्ही ऑनलाइन उघडू शकता. कुणीही नागरिक ते उघडू शकतो. अल्पवयीनांसाठी सुद्धा ही स्कीम उपलब्ध आहे. खाते सिंगल किंवा जॉईंट उघडू शकता. नॉमिनी रजिस्टर करण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, खाते उघडताना नॉमिनी रजिस्टर करू शकता.

 

SBI फ्लेक्सी डिपॉझिट स्कीममध्ये प्रीमॅच्युअर क्लोजरची सुविधा आहे. मात्र, अशावेळी 5 लाख
रुपयांपर्यंत डिपॉझिटसाठी सर्व टेन्योरच्या बाबतीत व्याजदरात 0.50 टक्केची कपात होईल. तर 5 लाख
रुपयांपेक्षा जास्तच्या डिपॉझिटसाठी व्याजदर 1 टक्का कमी होईल.

 

 

मिळतील हे फायदे

प्रिन्सिपल डिपॉझिटच्या 90 टक्केपर्यंतचे लोन/ओव्हरड्राफ्ट घेण्याची सुविधा मिळेल. सिनियर
सिटीझनसाठी व्याजदर, लागू दरापेक्षा 0.50 टक्के जास्त असेल. हे खाते उघडल्यानंतर 7 दिवस
पूर्ण होण्याच्या आत बंद केले तर व्याज शून्य राहिल.

 

Web Title : sbi flexi deposit scheme know eligibility interest rates and other details

 

 

Related Posts