IMPIMP

Aspergillus | रिकव्हर झालेल्या कोरोना रूग्णांच्या ‘ब्रेन’मध्ये आढळली भयानक ‘व्हाईट फंगस’ची गाठ, शास्त्रज्ञ झाले हैराण

by nagesh
Aspergillus | hyderabad rare white fungus abscess detected in brain of 60 years old corona recovered patient

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Aspergillus | कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) ची तिसरी लाट लवकरच सुरू होण्याची चर्चा सुरू असताना हैद्राबाद (Hyderabad) मधून एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्याने सर्वांची चिंता वाढवली आहे. येथे कोरोनातून रिकव्हर झालेल्या एका रूग्णाच्या ब्रेनमध्ये दुर्मिळ व्हाईट फंगसची गाठ म्हणजे एस्परगिलस (Aspergillus) आढळले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

रूग्णाच्या मेंदूत तयार झाली गाठ

 

हैद्राबादच्या सनशाईन हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. पी. रंगनाथम यांनी सांगितले की, हा रूग्ण मागील मे महिनयात कोरोना संक्रमित झाला होता. आजारात त्याच्या फुफ्फुसात गंभीर संसर्ग झाला होता, आणि त्यास बोलतानाही त्रास होत होता.

 

 

सर्जरी करून डॉक्टरांनी वाचवले प्राण

 

यानंतर त्याचे बॉडी स्कॅन करण्यात आले, ज्यामध्ये समजले की, रूग्णाच्या ब्रेनमध्ये क्लॉटसारखी संरचना तयार होत आहे. सतत उपचार करूनही क्लॉट बरा झाला नाही. यासाठी सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा समले की, व्हाईट फंगसने गाठ बनवली आहे जो अतिशय दुर्मिळ आजार आहे.

 

 

शुगर पेशंटला सर्वात जास्त धोका

 

मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टर रंगनाथम यांनी सांगितले की, अशी केस खुप रेयर असते. भारतात अशी प्रकरणे सहसा आढळत नाहीत. ही एक यूनीक केस आहे. सामान्यपणे फंगल इन्फेक्शन शुगरचे रुग्ण किंवा खराब इम्यून सिस्टमच्या रूग्णांमध्ये लवकर होते. परंतु 60 वर्षांच्या या रूग्णाला डायबिटीजची समस्या सुद्धा नाही. यासाठी चिंता वाढली आहे.

 

 

चिंतेचा विषय असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं

 

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर ब्लॅक फंगसच्या केस अचानक वाढल्या होत्या. विशेषता महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या रूग्णांच्या संख्येत जास्त वाढ झाली होती. मात्र, यानंतर व्हायरसचे अनेक व्हेरिएंट सुद्धा समोर आले. परंतु आता रुग्णाच्या मेंदूत व्हाईट फंगसच्या गाठीचा प्रकार समोर आल्याने शास्त्रज्ञ सुद्धा हैराणे आहेत.

 

 

धोका अजूनही कायम

 

डॉक्टरांचे म्हणणे आहे की जस-जसा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम कमी झाला,
तस-तशी ब्लॅक फंगस आणि नंतर व्हाईट फंगसची प्रकरणे सुद्धा कमी होत गेली,
परंतु धोका अजूनही टळलेला नाही. कोरोना नव-नवीन पद्धतीने लोकांना प्रभावित करत आहे.
यासाठी कोरोना प्रोटोकॉलचे सक्तीने पालन करत राहावे.

 

 

Web Title :-  Aspergillus | hyderabad rare white fungus abscess detected in brain of 60 years old corona recovered patient

 

हे देखील वाचा :

High Court | पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणे वैवाहिक बलात्कार, घटस्फोटासाठी हे ठोस कारण – उच्च न्यायालय

Pune Crime | शिक्षकेच्या पती अन् त्याच्या मैत्रिणीकडून फेसबुकवर अश्लील व घाणेरडया पोस्ट, महिलेनं उचललं मोठं पाऊल

Crime News | कलयुग ! पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने घेतली अग्निपरीक्षा, हातावर जाळला कापूर विश्वास न बसल्याने पाजले विष

 

Related Posts