IMPIMP

Anti-Corruption | इचलकरंजीत 3 लाखाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनचा ट्रॅप

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

कोल्हापूर / इचलकरंजी : सरकारसत्ता ऑनलाइन  Anti-Corruption | शेत जमिनीच्या वादाचा निकाल आपल्या बाजूनं देतो असं सांगून तीन लाखाची लाच घेत असताना एकजण लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (Anti-Corruption) जाळ्यात सापडला आहे. भिकाजी नामदेव कुराडे (वय, 55, रा. चंदूर ता. हातकणंगले) असं लाच स्वीकरणाऱ्याचे नाव असून त्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई इचलकरंजीच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका हॉटेल जवळ झाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

यावरून पोलीस पथकाने सारंग भिकाजी कुराडे (Sarang Bhikaji Kurade) (वय, 26, रा. साईनगर चंदूर), इम्रान मुसा शेख (Imran Musa Sheikh)
(वय 41, रा. शंभर फुटी रोड, सांगली) या दोघा संशयीतांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, फिर्यादी यांची शिरोळ तालुक्यात शेतजमीन
आहे. या शेतजमिनीच्या मालकीचा वाद सध्या सुरू आहे. सुरवातीला प्रांत कार्यालयात फिर्यादी यांच्या विरोधात निकाल गेला होता. त्यानंतर फिर्यादी यांनी
अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

दरम्यान, फिर्यादी यांच्याशी भिकाजी कुराडे (Bhikaji Kurade) याने संपर्क साधला. निकाल आपल्याबाजूने लावून देण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली. त्यातील 2 लाख रुपये कुराडे याने घेतले होते. बाकी तीन लाख रुपयाची रक्कम घेत असताना कुराडे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक आदिनाथ बुधवंत (Adinath Budhwant) यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :  Anti-Corruption | Anti-corruption trap in Ichalkaranji bribery case of Rs 3 lakh

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 250 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Karad Crime | वारुंजी येथे 2 वर्षांच्या बालकासह महिलेचा आढळला मृतदेह; परिसरात खळबळ

Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हायकोर्टाचा धक्का, तातडीनं सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार

 

Related Posts