IMPIMP

10th Supplementary Examination | 10 वीच्या पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; जाणून घ्या

by nagesh
10th Supplementary Examination | admit card 10th supplementary examination available exam admission students

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन 10th Supplementary Examination | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (MSBSHSE) 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 10 वीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (Admit Card) जारी करण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थ्यांना गुरुवारपासून (दि. 14) उपलब्ध होणार आहे. शाळांनी ‘लॉग इन’ मधून प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’ करून त्याची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे.

 

राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले (Dr. Ashok Bhosale) यांनी परिपत्रकाच्या माध्यामातून याबाबत माहिती दिली आहे. 27 जुलै ते 12 ऑगस्ट 10 वीची लेखी, तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 26 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून शाळा ‘लॉग इन’ मध्ये प्रवेशपत्रे उपलब्ध होतील. असं सांगण्यात आलंय.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रत काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेश पत्रातील विषय, माध्यम यामध्ये बदल असल्यास त्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत. असं स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Web Title :- 10th Supplementary Examination | admit card 10th supplementary examination available exam admission students

 

हे देखील वाचा :

Sairat Fame Actor Arbaj Shaikh | सैराटमधील सल्याला पुण्यातील रिक्षावाल्यानं लुटलं ?, शिवीगाळ अन् मनस्ताप…

Pune Crime | पुण्यात एकट्या राहणार्‍या वृद्ध महिलेचा गळा दाबून खून

Maharashtra Rain Update | राज्यात पावसाचे थैमान ! आगामी 2 दिवस पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

 

Related Posts