IMPIMP

11th Admission Process Maharashtra | 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात; अर्ज कसा भराल? जाणून घ्या प्रोसेस

by nagesh
11th Admission Process Maharashtra | fyjc result 11th admission process starts from today know how to fill application maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन 11th Admission Process Maharashtra | विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला (11th Admission Process Maharashtra) आजपासून (30 मे 2022 रोजी) सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि भाग एक आजपासून भरता येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुंबई महानगर (Mumbai Metropolis), पुणे (Pune), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad), नाशिक (Nashik), अमरावती (Amravati), नागपूर (Nagpur) या विभागांमध्ये अकरावी (11th Admission) प्रवेशाची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज (Apply Online) करून लॉगइन आयडी (Login ID) आणि पासवर्ड (Password) मिळवायचा आहे. त्याचबरोबर 11 वी प्रवेशाचा भाग एक, ऑनलाइन शुल्क आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शक केंद्र निवडायचे आहे. तसेच 10 वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग-2 भरायचा आहे. याबाबत प्रक्रिया सविस्तर पाहा. (11th Admission Process Maharashtra)

 

 

प्रत्यक्ष अर्ज नोंदणी आणि भाग 1 भरण्याचे वेळापत्रक –

– ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि प्रवेश अर्ज 1 भरणं, अर्ज प्रमाणित करणे (ऑनलाईन अर्ज करून विद्यार्थ्यांनी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळविणे आणि ११ वी प्रवेशाचा भाग 1 भरणं, ऑनलाईन शुल्क भरणं, अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्रं निवडणं)

– विद्यार्थ्यांनी भरलेल्या माहितीचा अर्ज तपासून प्रमाणित करणे 30 मे 2022 पासून ते राज्य मंडळाच्या निकालापर्यंत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

– उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी आपली माहिती तपासून अंतिम करणे.

– शिक्षण उपसंचालकांनी शाळा / कनिष्ट महाविद्यालयाची माहिती तपासून देणे.

– 10 वीच्या निकालानंतर – विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 2 भरून प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची पसंतीक्रम नोंदविणे तसेच कोटांतर्गत राखीव जागांवरील प्रवेशासाठी पसंतीची महाविद्यालये निवडणे आणि ऑनलाईन नमूद करणे.

 

 

अर्ज भाग 1 कसा भरायचा ?

– विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून Login ID आणि Password तयार करायचा आहे.

– Login ID आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून इयत्ता 11 वी प्रवेशासाठीच्या अर्जाचा भाग 1 भरायचा आहे.

– ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करायचा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

– अर्ज प्रमाणित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्र निवडायचे आहे.

– मार्गदर्शन केंद्र अथवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित करून घ्यायचा आहे.

 

 

Web Title :-  11th Admission Process Maharashtra | fyjc result 11th admission process starts from today know how to fill application maharashtra

 

हे देखील वाचा :

Sangli Crime | सांगलीत युवकाचा निर्घृण खून; शहरात प्रचंड खळबळ

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Related Posts