IMPIMP

Aadhaar Link To JanDhan Account | जन धन खाते आणि आधार लवकरच करा लिंक; लाखोंचा मिळेल फायदा, जाणून घ्या

by nagesh
Aadhaar Link To JanDhan Account | link jan dhan account with aadhaar card follow these process and get this benefit

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Aadhaar Link To JanDhan Account | मोदी सरकारच्या (Modi Government) माध्यमातून अनेक योजना राबवल्या जात आहेत. 2014 साली सरकारने प्रधानमंत्री जन धन योजना PM JanDhan Yojana (PMJDY) सुरू केली आहे. या योजने अंतर्गत मोदी सरकारने भारतातील प्रत्येक वर्गाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या प्रत्येक योजनेच्या विविध अपडेट, सुचना सरकार वेळोवेळी देत असते. दरम्यान, आधार कार्ड आणि जन धन खाते लिंक (Aadhaar Link To JanDhan Account) करणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जन धन योजनेअंतर्गत देशात एकूण 44.23 कोटी बँक खाती सुरू केलीत. या 44.23 कोटी खात्यांपैकी 33.9 कोटी खाती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये उघडण्यात आली. दुसरीकडे, ग्रामीण बँकांमध्ये 8.05 खाती आणि खाजगी बँकांमध्ये 1.28 खाती उघडण्यात आली. या खात्यात, थेट लाभ ट्रान्सफर शिवाय सरकार लोकांना डेबिट कार्ड सुविधा प्रदान करते. मात्र, जन धन खाती आधार कार्डशी लिंक करणे खूप गरजेचे आहे. तसे न केल्यास लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आधार जन धन खाते लिंक करण्याची प्रक्रिया जाणून घ्या. (Aadhaar Link To JanDhan Account)

 

दरम्यान, आधार कार्ड आणि जन धन खाते लिंक केल्यावर जन धन खात्यात PMJDY खातेधारकाला रुपे डेबिट कार्डची (Rupay Debit Card) सुविधा मिळते. या कार्डमध्ये 1 लाखाचा अपघात विमा कवच उपलब्ध आहे. पण, खातेधारकाच्या नॉमिनीने जर त्याचे खाते आधार कार्डशी लिंक केले असेल तरच त्याला या विमा संरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. डेबिट कार्ड शिवाय, खातेदाराला 30 हजार रुपयांच्या अपघाती मृत्यू विम्याचा स्वतंत्रपणे लाभही मिळतो. अशा परिस्थितीत जनधन खाते लवकरात लवकर आधार कार्डशी लिंक करणे महत्वाचे आहे.

 

जाणून घ्या प्रक्रिया –

दोन्ही लिंक करण्यासाठी सर्वात आधी त्या बँकेत जा, जिथे तुम्हाला खाते लिंक करायचे आहे.

बँकेत जाताना आधार कार्डाची फोटो कॉपी सोबत घ्यावी.

येथे तुम्हाला दोन्ही लिंक करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.

यानंतर बँक तुमचे आधार कार्ड आणि जन धन खाते लिंक करेल.

याशिवाय तुम्ही मोबाईल SMS द्वारे लिंक करू शकता.

– यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून SMS पाठवा. यासाठी UID आधार क्रमांक खाते क्रमांक लिहा आणि 567676 या क्रमांकावर पाठवा.

यानंतर तुमचे आधार आणि जनधन खाते लिंक होईल.

याशिवाय तुम्ही दोन्ही बँकेच्या ATM शी लिंक करू शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Aadhaar Link To JanDhan Account | link jan dhan account with aadhaar card follow these process and get this benefit

 

हे देखील वाचा :

Diabetes Diet | शुगर कंट्रोल करण्यात अतिशय प्रभावी आहे भेंडी, डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ 3 प्रकारे करावे सेवन

MNS Chief Raj Thackeray | ‘राज ठाकरेंना भाषणाआधी हातापायाला सुटतो घाम’; स्वत: सांगितली भाषणाआधी कशी करतात तयारी?

CBI Raid In Bank Fraud Case | पुण्यातील बड्या उद्योगपतीशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयच्या टीमकडून छापे

 

Related Posts