IMPIMP

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 30 हजाराच्या लाच प्रकरणी सरपंच, उप सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption bureau : Sarpanch, deputy sarpanch in anti-corruption net in bribery case of 30,000

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | 40 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 30 हजार रूपयाची लाच (Ratnagiri Bribe Case) घेतल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील राजीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच (Sarpanch) आणि उप सरपंचास (Upsarpanch) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Maharashtra) पथकाने अटक केली आहे (Ratnagiri ACB Trap). त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

 

प्रशांत प्रदिप शिर्के Prashant Pradeep Shirke (सरपंच) आणि सचिन रमेश पाटोळे Sachin Ramesh Patole (उप सरपंच, ग्रामपंचायत राजीवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) अशी लाच घेणार्‍यांची नावे आहेत (Ratnagiri Crime News). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांचे मित्राच्या वतीने राजीवली ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील पाखाडी तयार करण्याचे काम केले होते. यापुर्वी केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्याचा मोबदला आणि सध्या पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्याचा मोबदला म्हणून सरपंच प्रशांत प्रदिप शिर्के आणि उप सरपंच सचिन रमेश पाटोळे यांनी 40 हजार रूपयाची मागणी केली. तडतोडीअंती 30 हजार रूपये लाच घेण्याचे ठरले. (ACB Trap News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लाच रक्कमेपैकी 15 हजार रूपये सरपंच प्रशांत शिर्के आणि 15 हजार रूपये उप सरपंच सचिन पाटोळे आज घेतले.
त्यावेळी त्यांना सरकारी पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे (Thane ACB SP Sunil Lokhande),
अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उप अधीक्षक सुशांत चव्हाण (DySP Sushant Chavan), पोलिस निरीक्षक अनंत कांबळे
(PI Anant Kamble), पोलिस निरीक्षक प्रवीण ताटे (PI Pravin Tate), पोलिस संदीप ओगले, विशाल नलावडे,
श्रेया विचारे, दीपक आंबेकर, राजेश गावकर आणि प्रशांत कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Web Title :-  ACB Trap News | Anti-corruption bureau : Sarpanch, deputy sarpanch in anti-corruption net in bribery case of 30,000

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | 16 आमदारांचा निर्णय कधी, कशी अशी असेल प्रक्रिया? विधानसभा अध्यक्षांनी लंडनमधून दिली माहिती

Pune Cyber Police Crime News | पुणे सायबर पोलिस क्राईम न्यूज : विमा पॉलिसीच्या बहाण्याने 2 कोटींचा गंडा घालणार्‍याला दिल्लीतून अटक

Maharashtra Political Crisis | भरत गोगावलेंची प्रतोतपदी पुन्हा नियुक्ती होणार?, शिंदे गटाचे खासदार म्हणाले…

 

Related Posts