IMPIMP

Pune Cyber Police Crime News | पुणे सायबर पोलिस क्राईम न्यूज : विमा पॉलिसीच्या बहाण्याने 2 कोटींचा गंडा घालणार्‍याला दिल्लीतून अटक

by nagesh
une Cyber Police Crime News | 2 crore extortionist arrested from Delhi on the pretext of insurance policy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Cyber Police Crime News | विमा पॉलिसी (Vima Policy) काढून देण्याच्या बहाण्याने एका डॉक्टरांना दोन कोटी रुपयांना गंडा घालणार्‍या सायबर चोरट्याला (Cyber Thieves) सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) दिल्लीतून (Delhi) अटक केली. आरोपींनी डॉक्टरांकडून पैसे घेताना तब्बल १८ बँकेतील ४१ खात्यांचा वापर केला होता. देशभरातील अनेक राज्यांमध्ये या टोळीने अशा प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. (Pune Cyber Police Crime News)

 

शहवान सलिम अहमद Shahwan Salim Ahmed (रा. लक्ष्मीनगर, दिल्ली – Laxmi Nagar Delhi) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात सायबर पोलिसांनी याअगोदर संदीपकुमार पुत्र धर्मपाल (Sandeepkumar Putra Dharampal) , साहिब खान नसीर अली (Sahib Khan Nasir Ali), तुआजिब खान अकिल अहमद (
Tuajib Khan Akil Ahmed) यांना अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपी शहवान अहमद पसार होता. (Pune Cyber Police Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शहरातील एका नामांकित डॉक्टरला विमा पॉलिसीत गुंतवणुक केल्यास फायदा होईल तसेच नफाही मिळेल,
असे आमिष दाखविले होते. त्यानंतर डॉक्टरांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांना वेळोवेळी २ कोटी रुपये वेगवेगळ्या
खात्यात भरायला लावले होते. सायबर पोलिसांनी या सर्व खात्यांची माहिती घेऊन दिल्लीतून तिघांना अटक केली होती.
शहवान अहमद याचा शोध घेत असताना तो दिल्लीत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. शहवान याचा शोध घेऊन त्याला पकडण्यात आले.
दिल्लीतील न्यायालयाकडून (Delhi Court) प्रवासी कोठडी (Transit Remand) मिळवून पोलिसांनी शहवानला पुण्यात आणले आहे.

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे
(DCP Shriniwas Ghadge), सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले (ACP Vijaykumar Palsule) यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील (Sr PI Minal Supe-Patil),
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत (PI Chandrasekhar Sawant) , पोलीस कर्मचारी प्रवीणसिंह रजपूत, वैभव माने,
अमोल कदम, किरण जमदाडे आदींनी ही कारवाई केली.

 

 

Web Title :- Pune Cyber Police Crime News | 2 crore extortionist arrested from Delhi on the pretext of insurance policy

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | भरत गोगावलेंची प्रतोतपदी पुन्हा नियुक्ती होणार?, शिंदे गटाचे खासदार म्हणाले…

Congress Mohan Joshi On Shinde Fadnavis Govt | बेकायदेशीर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा – मोहन जोशी

NCP Chief Sharad Pawar | काही निर्णय अजून व्हायचे आहेत, न्यायालयाच्या निकालानंतर शरद पवार यांचे सूचक विधान

Dr. Baba Adhav – Actor Kiran Mane | डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते अभिनेते किरण माने यांना सम्यक पुरस्कार प्रदान

 

Related Posts