IMPIMP

Maharashtra Political Crisis | भरत गोगावलेंची प्रतोतपदी पुन्हा नियुक्ती होणार?, शिंदे गटाचे खासदार म्हणाले…

by nagesh
Maharashtra Political Crisis | new whip appointment process starts today rahul shewale after bharat gogawle s appointment illegal

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Political Crisis | मागील 11 महिन्यांपासून सुरु असलेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भूमिका आणि भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची प्रतोतपदी केलेली नियुक्ती यावरुन ताशेरे ओढले. भरत गोगावलेंची प्रतोदपती करण्यात आलेली नियुक्ती ही बेकायदेशीर असल्याचे कोर्टाने म्हटले. यावर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Shinde Group MP Rahul Shewale) यांनी भाष्य केलं आहे.

 

व्हिप (Whip) म्हणून कुणाला नियुक्त करायचे हे राजकीय पक्ष ठरवेल, त्या प्रमाणे आजपासून आम्ही नवीन व्हिपची नियुक्ती प्रक्रिया सुरु करु,असे राहुल शेवाळे यांनी सांगितले. गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती चुकीची असल्याचे न्यायालयाने सांगितल्यानंतर (Maharashtra Political Crisis) आता शिंदे गटाकडून नवा प्रतोद नियुक्त करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. नवा प्रतोद निवडण्याची ही प्रक्रिया आजपासूनच सुरु करण्यात येईल. व्हिप म्हणून नियुक्ती करताना ज्या चुका राहिल्या त्या सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिल्याचे शेवाळे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राहुल शेवाळे म्हणाले की, राज्यातील शिंदे सरकार (Shinde Government) हे घटनेनुसार तयार झालेले सरकार आहे असं न्यायालयाने सांगितले आहे. भरत गोगावले यांची नियुक्ती ही बेकायदेशीर नाही तर त्यामध्ये प्रक्रिया फॉलो करण्यात आली नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे आता आम्ही नवीन प्रतोदची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु करु.

 

व्हिप म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवल्यानंतर आता सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांचा
व्हिप लागू होतो, त्यामुळे त्या आधारे 16 आमदारांना अपात्र करावं अशी मागणी अनिल परब (Anil Parab) यांनी
केली आहे. यावर बोलताना राहुल शेवाळे म्हणाले, व्हिप नियुक्ती ही राजकीय पक्षाने केली पाहिजे असं कोर्टाने म्हटलं
आहे. त्यामुळे आजपासूनच आम्ही नवी व्हिपची प्रक्रिया सुरु करत आहोत. विधानसभा अध्यक्ष जो ठरवतील तोच
व्हिप असेल, असेही शेवाळा यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | new whip appointment process starts today rahul shewale after bharat gogawle s appointment illegal

 

हे देखील वाचा :

Congress Mohan Joshi On Shinde Fadnavis Govt | बेकायदेशीर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा – मोहन जोशी

NCP Chief Sharad Pawar | काही निर्णय अजून व्हायचे आहेत, न्यायालयाच्या निकालानंतर शरद पवार यांचे सूचक विधान

Dr. Baba Adhav – Actor Kiran Mane | डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते अभिनेते किरण माने यांना सम्यक पुरस्कार प्रदान

 

Related Posts