IMPIMP

ACB Trap News | 50 हजाराच्या लाचप्रकरणी पुण्यातील पोलिस अधिकार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

by sachinsitapure
ACB Trap News | police officers in pune in anti corruption net 2

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यातील (Vishrambaug Police Station) पोलिस उपनिरीक्षकास 50 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडून (Pune ACB Arrest PSI In Bribe Case) अटक करण्यात आली आहे. त्यांना 15 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (ACB Trap News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

शंकर धोंडिबा कुंभारे PSI Shankar Dhondiba Kumbhare (43, पोलिस उपनिरीक्षक, विश्रामबाग पोलिस स्टेशन, पुणे शहर) असे लाच घेणार्‍या पोलिस अधिकार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शंकर कुंभारे हे विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांच्याकडे तक्रारदार यांच्याविरूध्दच्या तक्रारी अर्जाची चौकशी देण्यात आली होती. तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल न करण्यासाठी पीएसआय शंकर कुंभारे यांनी तक्रारदाराकडे सुरूवातीला 50 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. (ACB Trap News)

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. दरम्यान, तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता त्यामध्ये पीएसआय शंकर कुंभारे यांनी तडजोडीअंती 30 हजार रूपयाची लाच घेण्याचे मान्य केले. त्यापैकी 15 हजार रूपयाची लाच घेताना पीएसआय शंकर कुंभारे यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सरकारी पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरूध्द विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Dr. Sheetal Janve-Kharade)
यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस उप अधीक्षक नितीन जाधव (DySP Nitin Jadhav) यांनी कळविले आहे.

Web Title :  ACB Trap News | police officers in pune in anti corruption net 2

हे देखील वाचा

Related Posts