IMPIMP

Pune Crime News | पुण्याच्या लोहगाव परिसरातून 1 कोटींचे अफिम जप्त ! विशेष मोहिमेंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाची तीसरी मोठी कारवाई

by sachinsitapure
Pune Crime News | Opium worth 1 crore seized from Lohgaon area of ​​Pune! The third major operation of the anti-narcotics squad under the special operation 

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | अफिम (Opium) हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या परराज्यातील एकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने (Anti Narcotics Cell) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल 1 कोटी 10 लाख 38 हजार रुपये किमतीचे 5 किलो 519 ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. (Pune Crime News)

अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी मागील तीन दिव्सात तीन मोठ्या कारवाया केल्या असून जवळपास दीड कोटींचा (Pune Crime News) अफिम हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने 31 जुलै रोजी विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीतून राहुलकुमार भुरालालजी साहु Rahul Kumar Bhuralalji Sahu (वय-32 रा. मु.पो. मंगलवाडा, तहसील दुंगला, जि. चितोडगड, राज्य राजस्थान-Rajasthan) याला अटक करुन अफिम जप्त केले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मांढेर यांना माहिती मिळाली की लोहगाव येथील पोरवाल रोड येथील एसबीआय बँके (SBI Bank) जवळील आयजीधान सोसायटीच्या गेट समोर एक व्यक्ती उभा असून त्याच्याकडे अफिम हा अमंली पदार्थ आहे. पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अफिम जप्त करुन विमानतळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने 28 जुलै रोजी फुरसुंगी येथे सापळा रचून मोहनलाल मेगाराम बिश्नोई Mohanlal Megaram Bishnoi (वय-24 रा. बगरापूर मारवाडी, तहसील बुडामालाने, जि. बाडनेर राज्य राजस्थान) याला अटक करुन 60 लाख रुपये किंमतीचे 3 किले 29 ग्रॅम अफिम जप्त केले होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे 2 सतीश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे (PI Sunil Thopte),
पोलीस उपनिरीक्षक एस.डी. नरके (PSI S.D. Narake),
दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), पोलीस अमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले,
संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड,
संदिप शेळके, महेश साळुंखे, साहिल शेख, नितीन जगदाळे, आझीम शेख, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांच्या पथकाने केली.

Web Title :  Pune Crime News | Opium worth 1 crore seized from Lohgaon area of ​​Pune! The third major operation of the anti-narcotics squad under the special operation

हे देखील वाचा

Maharashtra Political News | निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार

Related Posts