IMPIMP

ACB Trap On Police Inspector | पोलीस निरीक्षक मुरलीधर करपेसह तिघांवर गुन्हा दाखल ! वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली लाच मागण्याचे प्रोबेशनरी PSI ला प्रशिक्षण?, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी मागितले 10 ग्रॅम सोन्याचे कॉईन आणि 65 हजार रुपयांची लाच

by sachinsitapure
Sr PI Muralidhar Karpe

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap On Police Inspector | फसवणुक झालेल्या तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी लाच घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी लाच मागणार्‍या वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह तिघांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी प्रोबेशनरी पोलीस अधिकार्‍यांना तपासाविषयी मार्गदर्शन करणे आवश्यक असते. परंतु, येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रोबेशनरी पीएसआयला लाच कशी मागावी याचे मार्गदर्शन करीत असल्याचे दिसून आले आहे. (ACB Trap On Police Inspector)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर गंगाधर करपे (Sr PI Muralidhar Karpe), पोलीस उपनिरीक्षक राहुल जाधव (PSI Rahul Jadhav) आणि पोलीस हवालदार गणेश मोजर (Police Ganesh Mojar) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण मुंबईतील आर सी एफ पोलीस ठाण्यात (R.C.F. Police Station) नेमणूकीला आहेत. (ACB Trap On Police Inspector)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एक सराफ असून व्याजाने पैसे देण्याचा व्यवसायही करतात. त्यांनी तिघांना वेगवेगळ्या कारणासाठी व्याजाने पैसे दिले होते. तसेच त्यांनी त्यांच्या दुकानातून सोनेही खरेदी केले होते. फिर्यादी यांची ९१ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) झाली होती. फिर्यादी यांनी त्यासंबंधितीचा अर्ज आर सी एफ पोलीस ठाण्यात दिला होता. त्याची चौकशी प्रोबेशनरी पीएस आय राहुल जाधव हे करत होते. त्यांनी फिर्यादी यांचा जबाब नोंदविला. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक करपे यांची भेट घेतली.

तेव्हा त्यांची तक्रारीची फाईल वरिष्ठांकडे पाठविण्याकरीता ऑगस्ट महिन्यांमध्ये १ लाख रुपयांची लाचेची मागणी केली.
त्याप्रमाणे त्यांनी ३ ऑगस्ट २०२३ रोजी करपे यांच्या अ‍ॅन्टी चेंबरमधील बेडवरील उशीखाली ठेवली.
त्यानंतर दोन दिवसांनी प्रोबेशनरी जाधव याने अर्जावर कारवाई करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
फिर्यादी यांनी त्यांना २५ हजार रुपये पोलीस ठाण्यात आणून दिले. गणेश मोजर यानेही १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
तेव्हा फिर्यादी यांनी त्यालाही ५ हजार रुपये दिले. त्यानंतरही त्यांच्या तक्रार अर्जावर काहीही कारवाई केली गेली नाही.
त्यांनी चौकशी केली. तेव्हा वरिष्ठांनी तुमची फाईल परत पाठविली आहे.
तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल करण्याकरीता २ लाख रुपयांची मागणी केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक करपे व पोलीस निरीक्षक राहुल जाधव यांनी फिर्यादीकडे १० ग्रॅमचे सोन्याचे नाणे़ ६० हजार रुपये
आणि पोलीस हवालदार गणेश मोजर याने ५ हजार रुपये अशी लाचेची मागणी केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यातील संभाषण रेकॉर्ड केले होते.
मात्र, त्यानंतर राहुल जाधव हे आजारी पडल्याने प्रत्यक्ष लाच स्वीकारण्यात आली नाही.
तरीही त्यांनी यापूर्वी लाच घेतली असल्याने तसेच लाचेची मागणी करण्यात आली असल्याने तिघांवर लाचेची
मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे (ACP Manisha Zende) तपास करीत आहेत.

Related Posts