IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | धक्कादायक! पत्नी WhatsApp वर चॅटिंग करते म्हणून गळफास देऊन जीवे मारण्याचा केला प्रयत्न, औंध मिलिटरी कॅम्पमधील प्रकार

by sachinsitapure
Sangvi Police Station

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | व्हॉट्सअॅप चॅटवर सतत का बोलते? याचा राग मनात धरुन पतीने दारुच्या नशेत पत्नीला गळफास देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना औंध मिलिटरी कॅम्प (Aundh Military Camp) परिसरात घडली आहे. याप्रकरणी पती आणि सासरे यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात (PCPC Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.10) रात्री दहा ते 13 डिसेंबर या कालावधीत रक्षक चौकातील औंध मिलिटरी स्टेशन येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत महिलेने गुरुवारी (दि.14) सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पती विकी रमेश सोनवणे (Vicky Ramesh Sonawane), सासरे रमेश तुकाराम सोनवणे Ramesh Tukaram Sonawane (दोघे रा. औंध मिलिटरी कॅम्प, पुणे) यांच्यावर आयपीसी 307, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअॅवपर चॅटिंग करत असायची.
हाच राग आरोपी पतीच्या मनात होता. याच कारणावरुन पती विकी याने त्याच्या पत्नीच्या गळ्याला दोरीचा फास लावला आणि सिलिंग फॅनला दोरी बांधून पत्नीला खुर्चीवर उभे केले. यानंतर खुची ढकलून देऊन पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. पत्नीने आरडा ओरडा केल्यानंतर शेजारचे त्यांच्या मदतीला धाऊन आले. त्यांनी गळ्यातील फास काढला. यामध्ये महिलेच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्या असून सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

आरोपी विकी सोनवणे हा लष्करात (Army) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेबाबत सासरे रमेश सोनवणे
यांना सर्व माहित असताना देखील त्यांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.
त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.डी. वरुडे (PSI M.D. Varude) करीत आहेत.

Related Posts