IMPIMP

Actor Singer Utkarsha Shinde | मराठी कलाकारांनी एकत्र येऊन व्यक्त होणं गरजेचं; उत्कर्ष शिंदेची रोखठोक भूमिका

by nagesh
Actor Singer Utkarsha Shinde | actor singer utkarsha shinde express his thoughts on cancellation of marathi film shows

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम – Actor Singer Utkarsha Shinde | सध्या ‘सनी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र या चित्रपटाला पुरेसे असे स्क्रीन नसल्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हेमंत ढोमे हा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या चित्रपटाचे अपडेट्स तो शेअर करत असतो. सनी या चित्रपटाचे बरेच शो हाउसफुल होत असूनही काही ठिकाणी तिकिटाचे पैसे परत करून शो कॅन्सल केल्याबद्दल हेमंतने सोशल मीडियावर खंत व्यक्त केली होती. (Actor Singer Utkarsha Shinde)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हेमंत च्या या सोशल मीडियावरील पोस्टला अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. हेमंत ची ही पोस्ट देखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. हेमंतच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली होती. हिंदी चित्रपटांना जास्त स्क्रीन देत मराठी चित्रपटांना डावलण्यात येत असल्याचे देखील नेटकऱ्यांनी म्हटले होते. तर आता यावर अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेनेही एक पोस्ट शेअर करत रोखठोक भूमिका घेतली आहे. (Actor Singer Utkarsha Shinde)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उत्कर्ष ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर सनी या चित्रपटाचा पोस्टर त्याचबरोबर हेमंत ढोमे याचा फोटो एकत्रित करत पोस्ट शेअर केला आहे.
तर कॅप्शन मध्ये म्हटले की, “आज मराठी सिनेमाला बर्बरतेतून तेथून समृद्धीच्या वाटेवर आणायचं असेल तर समानतेची वागणूक मिळायलाच हवी.
एकेकाळी कलाकार दादा कोंडके यांना देखील चित्रपटगृह मिळाले नव्हते.
बहुदा मुदाम मराठी चित्रपटाची गळचेपी करायचा मनसुबा काहींचा तेव्हाही होता आताही आहे.
तोच प्रश्न तीच वेळ तेच विचार तीच कुचंबणा तीच डावलण्याची मानसिकता आजही तोंड वर काढते.
या सगळ्याला सामोरे जायचे असेल तर एकजूट व्हायला हवे.
मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच चित्रपटगृह न मिळणे याहून दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणती नाही”.
सध्या उत्कर्ष शिंदेची ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तर याला अनेक कमेंट आणि लाईक देखील येत आहेत.

 

Web Title :- Actor Singer Utkarsha Shinde | actor singer utkarsha shinde express his thoughts on cancellation of marathi film shows

 

हे देखील वाचा :

Pune Rickshaw Strike | बाईक टॅक्सी सेवेविरोधात पुण्यात रिक्षाचालक करणार बेमुदत बंद; ‘बघतोय रिक्षावाला संघटने’च्या आवाहनाला इतर रिक्षा संघटनांचा पाठिंबा

Chitra Wagh | जालना जिल्ह्यातील अत्याचाराच्या घटनेवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘मुली आणि महिलांनी आपल्यावरील अत्याचार लपवून ठेवू नयेत, पोलिसांत तक्रार द्यावी’

Hanuman Teaser | ‘हनुमान’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; थेट ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’बरोबर तुलना

Raj Thackeray | तेजस्विनी पंडित बरोबरच्या मुलाखतीत राज ठाकरेंची दिलखुलास फटकेबाजी; म्हणाले, ‘मी स्वतः कसा दिसतो, हे…’

 

Related Posts