IMPIMP

Raj Thackeray | तेजस्विनी पंडित बरोबरच्या मुलाखतीत राज ठाकरेंची दिलखुलास फटकेबाजी; म्हणाले, ‘मी स्वतः कसा दिसतो, हे…’

by nagesh
Raj Thackeray | raj thackeray reaction on sammed shikharji row in jharkhand

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सध्या संपूर्ण भारतात वेब सिरिजचे (Web series) फॅड सुरु असून, दररोज नवनवीन वेब सिरीज सुरु होत आहेत. ‘अथांग’ (Athang) नावाच्या वेब सीरिजचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या वेब सिरीजची निर्मिती तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) केली असून, ट्रेलरच्या लाँचला खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित होते. त्यावेळी तेजस्विनी पंडित यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) मुलाखत घेतली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जर भविष्यात तुमच्यावर बायोपिक आला तर त्यात तुमची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारावी, असे तुम्हाला वाटते? असा प्रश्न तेजस्विनी पंडित यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) विचारला. “तुमच्या स्वतःच्या आयुष्यात एवढा ड्रामा आहे, त्यात राजकारण आहे, लव्हस्टोरी आणि आयुष्यातले इतर चढउतार आहेत, तर मग तुमच्यावर जर बायोपिक (Biopic) निघाला तर तुमची भूमिका कोणी साकारलेली पाहायला तुम्हाला आवडेल?” असा प्रश्न तेजस्विनी पंडित यांनी विचारला. त्याला अतिशय मजेशीर उत्तर राज ठाकरेंनी दिले.

 

त्यावर राज ठाकरे म्हणाले, “मला पहिलं घरी जाऊन बायकोला विचारावं लागेल, एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. मी पूर्वी जेव्हा सलूनमध्ये जायचो तेव्हा आजूबाजूला असलेल्या लोकांना पाहायचो आणि ते जेव्हा आरशात पाहायचे, तेव्हा त्यांच्या स्वतःच्या दिसण्याबद्दल काही कल्पना असायच्या. तसं मी स्वतः कसा दिसतो, हे आरसा सोडला तर मलाही माहीत नाही. त्यामुळे ती भूमिका कोण करू शकेल, हे मला माहीत नाही.” हे उत्तर ऐकून तेजस्विनी मात्र जोरात हसू लागल्या.

 

राज ठाकरेंच्या उत्तरावर तेजस्विनी पुन्हा त्यांना म्हणाल्या, “एका बायोपिकसाठी आवश्यक आहेत
अशा सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात गोष्टी आहेत.” यावर राज ठाकरे लगेच म्हणाले,
“आता माझी लव्हस्टोरी तुम्ही कुठून काढली माहीत नाही.” त्यावर तेजस्विनीने तुमची आणि तुमच्या बायकोची लव्हस्टोरी असे स्पष्ट केले.
त्यावर राज ठाकरे म्हणाले, “अच्छा तेच होतं का? मला वाटलं दुसरी कोणती लव्हस्टोरी जी मला माहीत नाही.”
या शिवाय जर भारतात कोणाची बियोपिक झालीच तर ती इंदिरा गांधींची (Pm Indira Gandhi) व्हायला हवी असे मत त्यांनी मांडले.
या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी एकूणच कलाविश्व आणि ओटीटी प्लॅटफॉर्म बद्दल मनमोकळेपणाने आपली मतं मांडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Raj Thackeray | raj thackeray open up on making biopic on his own life and who will play his role

 

हे देखील वाचा :

Sandeep Deshpande | 27 नोव्हेंबरला सर्वाचा हिशेब होणार; मसनेच्या संदीप देशपांडेंचे ट्वीट

IND Vs AUS Tour | भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन महिला संघ जाहीर; दोन नवीन खेळाडूंना संघात स्थान

Pune Crime | मुंढव्यात टोळक्याचा राडा, एकावर कोयत्याने वार करुन केली गाड्यांची तोडफड

 

Related Posts