IMPIMP

Chitra Wagh | जालना जिल्ह्यातील अत्याचाराच्या घटनेवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘मुली आणि महिलांनी आपल्यावरील अत्याचार लपवून ठेवू नयेत, पोलिसांत तक्रार द्यावी’

by nagesh
Chitra Wagh | change the name of aurangabad to dharmaveer chhatrapati sambhajinagar not chhatrapati sambhajinagar chitra wagh demand

जालना : सरकारसत्ता ऑनलाईन – जालना जिल्ह्यात एका महिलेला चहामध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आला. त्यावेळेचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून तिला वर्षभर ब्लॅकमेल केले गेले. आरोपींनी हा आक्षेपार्ह व्हिडीओ पिडीतेच्या पतीला पाठवला आणि त्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. त्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुली आणि महिलांनी आपल्यावरील अत्याचार लपवून ठेवू नयेत, त्यांनी पोलिसांत तक्रार द्यावी, त्यामुळे असे प्रकार रोखले जाऊ शकतात, असे चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोणत्याही महिला किंवा मुलीवर अत्याचार झाल्यास त्यांनी न घाबरता पुढे येऊन पोलिसांत तक्रार केली पाहिजे.
आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणाचा तपास जालना जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक करत आहेत.
त्यामुळे लवकरच आणि निश्चितपणे आरोपींना अटक केली जाईल. जर तेव्हाच पोलिसांत तक्रार केली असती,
तर अनर्थ टळला असता, असे यावेळी चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या आहेत.

 

या घटनेमुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
आणि हे कृत्य करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

 

Web Title :- Chitra Wagh | Chitra Wagh’s reaction to the incident of torture in Jalna district, said – ‘Girls and women should not hide their torture, report to the police’

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सेक्स्टॉर्शनमध्ये राजस्थानचे एक संपूर्ण गाव सहभागी; पुण्यातील तरुणांच्या आत्महत्येमुळे खुलासा

Raj Thackeray | तेजस्विनी पंडित बरोबरच्या मुलाखतीत राज ठाकरेंची दिलखुलास फटकेबाजी; म्हणाले, ‘मी स्वतः कसा दिसतो, हे…’

IND Vs AUS Tour | भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन महिला संघ जाहीर; दोन नवीन खेळाडूंना संघात स्थान

 

Related Posts