IMPIMP

Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’

by nagesh
Ajit Pawar | balasaheb thackeray birth anniversary ncp ajit pawar on balasaheb painting in vidhan bhavan

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Ajit Pawar | सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) व राज्य सरकारच्या (State Government) निर्णयाच्या सर्व बाबी समोर असताना एका व्यक्तीला त्यामध्ये फायदा मिळवून देत पदाचा दुरुपयोग केला आहे. ही बाब गंभीर असून या प्रकरणाची जबाबदारी स्विकारुन अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) द्यावा. त्यांनी राजीनामा दिला नाहीतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून (Cabinet) हकालपट्टी करावी, अशी मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सभागृहात मुख्यमंत्र्यांनी NIT प्रकरणात दिलेल्या निर्णयासंदर्भात चर्चा केली. मात्र, आताच उच्च न्यायालयाच्या (High Court) नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविषयी ताशेरे ओढले आहेत. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

 

वाशिम जिल्ह्यातील मौजे घोडबाभूळ येथील सरकारी गायरान जमीन (Gayran Land Case) गट नं.44 मधील 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा आहे. हा घोटाळा दीडशे कोटीचा आहे. गायरान जमिनी कुणाला देता येत नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. त्याचे पालन आपण करत आलो आहोत. असे असताना योगेश खंडारे (Yogesh Khandare) यांनी जिल्हा न्यायालयात मागणी केली होती. त्यांची ती मागणी फेटाळून लावली. जिल्हा न्यायालयाने योगेश खंडारे यांचा जमिनीवर कोणताही अधिकार नसताना तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. सरकारी गायरान जमीन हडपण्याचा त्याचा इरादा होता असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्याचे अजित पवार यांनी सभागृहाला सांगितले.

 

सत्तार यांची हकालपट्टी करा

राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या, अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे.
गायरान बेचनेवालों को जूते मारो सालों को, 50 खोके एकदम ओके, सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय
एकदम ओके, वसुली सरकार हाय हाय, श्रीखंड घ्या कुणी, कुणी भूखंड घ्या.
अशा घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरले. त्यांनी खाली बसून जोरदार निदर्शने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | abuse of office by abdul sattar in gayran land case ajit pawar

 

हे देखील वाचा :

Fixed Deposit | ७०० दिवसाच्या एफडीवर ही बँक देते ७.६०% व्याज, जाणून घ्या डिटेल्स

ITI Student Stipend | आयटीआय विद्यार्थ्यांना पाचशे रुपये विद्यावेतन तीन महिन्यात लागू करणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

 

Related Posts