IMPIMP

Ajit Pawar | ‘या’ कारणामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार गेले थेट बारामतीला

by nagesh
Ajit Pawar | balasaheb thackeray birth anniversary ncp ajit pawar on balasaheb painting in vidhan bhavan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन सध्या परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. दिवसा उन आणि रात्री पाऊस पडत असल्याने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील व्हायरल इन्फेक्शनचा (Viral Infection) फटका बसला आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

परतीचा पाऊस लांबल्याने सर्दी खोकल्याच्या आजारात वाढ झालेली पहायला मिळत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल इन्फेकशनचा फटका सामान्यांना बसत आहे. वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात सर्दी खोकल्याने नागरिक आजारी पडत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील व्हायरल इन्फेक्शन झाले आहे.

 

‘क्रीडाविश्वाचा आधारस्तंभ’ या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन समारंभ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते होणार होता.
परंतु सतत राज्याचा दौरा आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी खोकला झाल्याने अजित पवार यांनी आज (गुरुवार)
दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
अजित पवार यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून थेट बारामती गाठली आहे.

 

दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
तसेच या प्रमुख मागणीसह अजित पवार यांनी एकुण 10 मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत.
यामध्ये पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट 34 गावांचा विकास निधी अभावी रखडला असल्याचे निदर्शनास आणून दिले.
तसेच तातडीने यासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar cancelled today pune visit

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आधी मारली मजा, लग्नाचे नाव काढताच आठवली जात; तरुणाविरोधात बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Deepali Sayed | शिवसेनेला आणखी एक धक्का? दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार? सुषमा अंधारेंची पक्षातील एंट्री खटकली, म्हणाल्या – मी सध्या…

Ritesh Deshmukh | 16 जणांना डावलून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीला दिला भूखंड, भाजपाने केले गंभीर आरोप

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआय चौकशीसाठी जनहित याचिका दाखल, आदित्य ठाकरे म्हणाले…

 

Related Posts