IMPIMP

Deepali Sayed | शिवसेनेला आणखी एक धक्का? दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार? सुषमा अंधारेंची पक्षातील एंट्री खटकली, म्हणाल्या – मी सध्या…

by nagesh
Deepali Sayed | shivsena thackeray faction deepali sayyed on joining eknath shinde faction

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी, नेते फोडून आपल्यात घेणे हा शिंदे गटाचा (Shinde Group) एकसुत्री कार्यक्रम अजूनही सुरूच आहे. आता शिवसेनेत असलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) देखील शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. दरम्यान, दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची शिवसेनेतील एंट्री खटकली असल्याचे त्यांच्या एकुणच वक्तव्यावरून दिसून आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ज्यावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपाच्या (BJP) मदतीने शिवसेनेत उभी फुट पाडत राज्याची सत्ता स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न चालवला होता तेव्हा दीपाली सय्यद विविध वक्तव्य करत शिंदे गटावर जाहीरपणे टीका करत होत्या, सडेतोड उत्तरे देत होत्या.

 

नंतर अचानक दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी ठाकरे आणि शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. काही दिवसापूर्वी शिवसेनेने सुषमा अंधारे यांना उपनेत्या करताच दीपाली सय्यद नाराज झाल्याचे दिसून येत आहे. त्या पूर्वीसारख्या सक्रीय दिसत नाहीत. हेच कारण त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मी स्क्रीनवर येऊन तू-तू मै-मै करत नाही. जेव्हा गरज होती तेव्हा मी केली.

 

दीपाली सय्यद यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही सध्या शांत का आहात? यावर त्या म्हणाल्या सुषमाताई नुकत्याच आल्या असून त्यांना आपण शिवसेनेत आल्याचे आणि आपले अस्तित्व सिद्ध करायचे आहे. शिवसेनेत काम करताना मला आता साडेतीन वर्षं झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या तरच तुम्ही राजकारणात सक्रीय आहात असा समज करण्याची गरज नाही. जी लोक कामे करतात त्यांना पाठिंबा दिला तरच ती पूर्ण होतात.

 

दीपाली सय्यद म्हणाल्या, दोघे एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती आणि त्यासाठी मी वाट पाहत होते.
एकत्र आले तर आपले बळ वाढेल असे मला वाटत होते. कार्यकर्त्यांवर या गोष्टीचा फार परिणाम होत आहे.
जे कार्यकर्त्यांसोबत काम करतात त्यांनाच हे जाणवते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दीपाली सय्यद म्हणाल्या, प्रत्येकजण आपापली मतं मांडत आहेत.
प्रत्येकाने आपला गट निर्माण केला आहे. लवकरच माझाही गट दिसेल.
सध्या मी शिवसेनेत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसह आहात का? असा प्रश्न विचारला असता दीपाली सय्यद म्हणाल्या,
मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.

 

 

Web Title :- Deepali Sayed | shivsena thackeray faction deepali sayyed on joining eknath shinde faction

 

हे देखील वाचा :

Ritesh Deshmukh | 16 जणांना डावलून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीला दिला भूखंड, भाजपाने केले गंभीर आरोप

Pune Crime | हडपसर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकाला न्यायालयाचा दणका, कारणे दाखवा नोटीस; जाणून घ्या प्रकरण

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआय चौकशीसाठी जनहित याचिका दाखल, आदित्य ठाकरे म्हणाले…

 

Related Posts